Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै २२, २०१९

चंद्रपुरात सांबराची शिकार करून पार्टी करणे पडले महागात

चुलीवरील मासा सोबत ६ आरोपींना अटक 
चंद्रपूर/प्रतिनिधी: 



जंगलात सांबराची शिकार करून मांस शिजवित असलेल्या सहा जणांना वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. 

वनविकास महामंडळाच्या चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील जुनोना गावालगत कक्ष क्रमांक ४८१ मध्ये सांबराची शिकार करण्यात आली.ह्या शिकारीची माहिती वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना मिळाली . 



या माहितीच्या आधारे वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेख, साहाय्यक व्यवस्थापक आत्राम यांनी जुनोना गाव गाठून झडती सुरू केली. यात काही नावे पुढे आल्यावर त्यांच्या घराची झडती घेन्यात आली, त्यात आरोपींच्या घरी सांबराचे मटण शिजवित असल्याचे आढळून आले. 

या नंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मांसासह आरोपींना अटक केली. आरोपीकडूनसूरी, कुऱ्हाड,व  शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त कले .

या शिकार प्रकरणात प्रदीप वेट्टी, भीमराव सिडाम, प्रकाश दुर्योधन, शिषुपाल दुर्योधन, नीलेश् रायपुरे, मंगेश दुर्योधन अश्या मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

आरोपींवर भारतीय वन अधी १९२७ चे कलम २६(२)

 भा.वन. अधि १९७२/९,३९,४०,४१,४४,५१,५२
भा. द.स.१९६० कलम १३९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.