Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै २१, २०१९

तेलगु भाषीकांच्या मागण्यांसाठी सोमवारी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

 

चंद्रपूर जिल्हात राहणा-या तेलगु भाषीकांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी उदया सोमवारी 22 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालया समोर किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरिय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. चांदा तेलगु सेवा संघम समीती, ऑल तेलगू समाज विकास बहुउद्देशीय संस्था, बल्लारशाह  तथा विदर्भ तेलगु समाज यांच्या वतीने हे आंदोलन आयोजीत करण्यात आले आहे.

 चंद्रपूर जिल्हा हा औदयोगीक जिल्हा आहे. त्यामुळे रोजगाराकरिता विविध भाषीक नागरिक चंद्रपूरात स्थायी झाले आहे. यात तेलगु भाषीक नागरिकांची संख्या मोठी आहे. पिढी दर पिढी चंद्रपूरात वास्तव्यास असलेल्या तेलगू भाषिक नागरिकांना अणेक समस्यांना समोर जावे लागत आहे. त्यामूळे त्याच्या विविध मागण्यांना घेउन यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हास्तरिय भव्य धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तेलगु भाषिक विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोपी करावी, ज्या विदयार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र आहे. 

त्या विदयार्थ्यांना व्हॅलीडिटी देण्यात यावी, तेलगु भाषिकांसाठी प्रत्येक तालुक्यात भव्य सभागृह बांधण्यात यावे, तेलगु भाषिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, तेलगु भाषिक विद्यार्थ्यांना स्कॉंलरशिप देण्यात यावी,तेलगू भाषिक विद्यार्थ्यांकरीता स्वतंत्र वस्तिगृहाचे निर्माण करण्यात यावे, तेलगु भाषिकांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी निर्माण करण्यात यावी, वेकोली मधून निवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या पेंशनमध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांसह ईतर मागण्यांकडे या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. आंदोलना नंतर एक शिष्ट मंडळ जिल्हाधिका-यांची भेट घेणार असून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. 

या आंदोलनाला तेलगु भाषिकांनी मोठया संख्येन उपस्थित राहण्याचे आवाहण तेलगु भाषिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.