Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै २१, २०१९

धारिवाल कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी किशोर जोरगेवार आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

चंद्रपुर/प्रतिनिधी: 

धारिवाल कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किशोर जोरगेवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या कमलाकर मलरप्पा, रशीद शेख ,बलराम डोडाणी व संदीप कष्टी या,कार्यकर्त्यावर गुरुवारी FIR दाखल करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वी त्यांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी धारिवाल कंपनीवर मोर्चा काढला होता. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने यावर कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले नाही असा आरोप उपस्थितांनी केला, ह्याच विषयांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी तहसीलदार कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार रवींद्र माने, धारिवाल कंपनीचे सहप्रबंधक संतोष काकडे, व्यवस्थापक संदीप मुखर्जी व किशोर जोरगेवार आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 कंपनीत स्थानिक बेरोजगारांना डावलण्यात येत असून या कंपनीने स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा या मागणीसाठी यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष हे आक्रमक झाले होते.

  चर्चेदरम्यान यंग चंदा ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यापैकी एकाने कंपनीचे सहप्रबंधक संतोष काकडे यांना थापड लगावली.विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसीलदार माने,पोलिस कर्मचारी,व इतर अधिकारी ह्यांच्या समोर घडला,

 या प्रकरणात  शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र  तक्रारदाराची मनस्थिती  व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी परत गुरुवारी  सविस्तर  तक्रार रामनगर पोलीस स्टेशन येथे दाखल केली.या तक्रारीत किशोर जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात भादंवी कलम 143,147,149 ,323, 352, 504, 506 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गैर अर्जदारा पासून माझ्या जीवाला धोका असल्याचे तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे. व आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये चर्चा करण्यासाठी जात असतांना शिष्टमंडळ नेले जाते, मात्र या ठिकाणी  जोरगेवार यांच्या मागे शेकडो लोक केबिनमध्ये व बाहेर देखील उपस्थित होती त्यामुळे तहसीलदार यांच्या केबिन मध्ये जाण्यासाठी काही प्रोटोकॉल नियम वगैरे नाहीत का?असा सवाल देखील तक्रारदाराने उपस्थित केला आहे,
आता हे प्रकरण समोर कोणतं वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.