द्रुगधामना हायस्कूल मध्ये वृक्षदिंडी
नागपूर / अरुण कराळे :
पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा शेती व शेती उद्योगावर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडी करून वृक्षसंवर्धन करा . महाराष्ट्र शासनाने हरित महाराष्ट्रासाठी आणि जमिनीची होणारी धूप थांबवण्यासाठी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे.
जंगलांची बेसुमार कत्तल होत असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. पृथ्वीवरील हिरवा शालू जागोजागी फाटल्यामुळे जागतिक तापमानवाढ, निसर्गाचे बिघडलेले चक्र, दुष्काळ असे भयंकर परिणाम समोर येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत उन्हाळा अधिक प्रखर होऊ लागला आहे. महाराष्ट्रात तर यावर्षी अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षांची लागवड करून पृथ्वीला पुन्हा हिरव्या शालूने मढविणे हा एकमेव पर्याय आहे .तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणा-या झाडांची कदर केली जात नाही . असे प्रतिपादन नरखेड नगर परिषदच्या माजी नगरसेविका तथा द्रुगधामना हायस्कूल , आदर्शकला व वाणिज्य महाविद्यालय व एमसीव्हीसी महाविद्यालयाच्या प्राचार्या पदमा मदनकर ( वैद्य ) यांनी केले.
दवलामेटी येथील द्रुगधामना हायस्कूल , आदर्शकला व वाणिज्य महाविद्यालय व एमसीव्हीसी महाविद्यालय तर्फे प्राचार्या पदमा मदनकर ( वैद्य ) यांच्या हस्ते दवलामेटी , टोली व हेटी परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली . शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेचा प्रसार करण्यासाठी परिसरातून वृक्ष दिंडी काढण्यात आली .मुली वाचवा मुली शिकवा I पर्यावरणाचे रक्षण करा, स्वच्छतेचे भान ठेवा I झाडे लावा, झाडे जगवा I एक मुल, एक झाड I बंदर करतात हूप हूप , झाडे लावा खूप खुप , अश्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून टाकला.
विद्यार्थ्यांनी हातात विविध प्रकारच्या झाडांची रोपे घेऊन झाडे लावण्याचे व जगविण्याचे आव्हान ग्रामस्थांना केले . यावेळी वसंत हरले , अरूण कराळे , लक्ष्मण खडसे, अशोक राऊत,प्रकाश मस्के , पुष्पा सोमकुवर, मंदा फालके, मालती बेले ,आरती भोरे , ज्योती अढावू , सुनीता चव्हाण , वंदना मुसळे , मंदा फालके, वंदना जाभुंळकर , नरेंद्र शेळके ,विलास चौधरी , लक्ष्मण शिंदे , बंडुभाऊ मोहोड ,नामदेव राऊत, शंकर राऊत, मंजुबाई शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते .