महावितरणचा उपक्रम
मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता सहभागी होणार
२३ जुलैपासून उपक्रमाला होणार सुरवात
नागपूर/प्रतिनिधी:
सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी नागपूर परिमंडल अंतर्गत सर्व संवसु उपविभाग कार्यालयांमध्ये वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजित करण्याचे निर्देश मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिले आहेत. येत्या दि. २३ जुलैपासून या उपक्रमाला सुरवात होणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कॉग्रेसनगर या विभागांतर्गत असलेल्या उपविभागिय कार्यालयांमध्ये 23 जुलै पासून दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. संबंधीत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्वत: ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबील दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी दाखल करून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतील. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
नागपूर परिमंडलात येत्या २३ जुलैपासून आयोजित वीजग्राहक मेळाव्याच्या उपक्रमाला सुरूवात होत आहे. प्रभारी प्रादेशिक संचालक व नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल तसेच अधीक्षक अभियंता दिलीप दोडके हे कार्यालयीन दौ-यादरम्यान विभाग कार्यालयात आयोजित या उपक्रमात सहभागी होऊन वीजग्राहकांशी थेट संवाद साधणार आहेत.
काँग्रेस नगर विभागांतर्गत येणाऱ्या हुडकेश्वर उपविभागातील खरबी वितरण केंद्रातील वीज ग्राहकांनाच मेळावा २३ जुलै रोजी ३३ के.व्ही.वीज उपकेंद्रात,हुडकेश्वर वितरण केंद्रातील वीज ग्राहकांचा मेळावा दिनांक २५ जुलै रोजी पिपळा ग्राम पंचायत कार्यालय, बेसा वितरण केंद्रातील वीज ग्राहकांच्या मेळावा त्याच ठिकाणीदिनांक २६ जुलै रोजी होणार आहे.
त्रिमूर्ती नगर उप विभागातील वीज ग्राहकांचा मेळावा भगवती सभागृहात दिनांक २५ जुलै रोजी तर शंकरनगर उप विभागातील वीज ग्राहकांचा मेळावा राणी लक्ष्मीबाई सभागृहात २६ जुलै रोजी होणार आहे. रिजन्ट उपविभागातील वीज ग्राहकांचा मेळावा साईकृपा मंगल कार्यालय येथे २९ जुलै रोजी होईल. अशी माहिती काँग्रेस नगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी दिली आहे.
उमरेड विभागातील पाचगाव येथे २३ जुलै रोजी उमरेड उपविभागातील वीज ग्राहकांचा मेळावा होणार आहे. या उमरेड तालुक्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी २५ जुलै रोजी उमरेड येथे , दिनांक ३१ जुलै रोजी सिर्सीला आणि ३ ऑगस्ट रोजी बेला येथे मेळावा आयोजित कार्यांत येणार आहे. २४ जुलै रोजी कुही उप विभागाचा याचा उपविभागात येणाऱ्या मांढळ येथे ३० जुलै रोजी तर वेलतूर येथे २ ऑगस्ट रोजी मेळावा होणार आहे.
भिवापूर उपविभागातील वीज ग्राहकांच्या मेळावा २६ जुलै रोजी होईल.याच उपविभागात येणाऱ्या जावळी येथे १ ऑगस्ट, नांद येथे २९ जुलै रोजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे यांनी दिली.