चंद्रपूर/प्रतीनिधी:
इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वाहणारी आणि तन, मन अन् धन उद्धारकार्यास अर्पण करणारी काही नररत्ने होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक. आपल्या भारतमातेच्या थोर सुपुत्रांचे स्मरण म्हणजे कर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्रोत. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत आलेले आहे.
केवळ भारतीयांनाच नव्हे, तर जगातील साऱ्या मानवाला आपले हे सांस्कृतिक धन म्हणजे कुतूहलाचा विषय आहे. ‘लोकमान्य’ पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी आणि चिकाटी व्यक्तीमत्त्वाची २३ जुलै २०१९ या दिवशी जयंती चंद्रपूर शहर महानगरपालिकेत मा. उपमहापौर श्री. अनिल फुलझेले यांचे हस्ते प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून साजरी करण्यात आली.
या प्रसंगी मनपा मुख्य लेखापरीक्षक श्री. मनोज गोस्वामी, श्री आत्राम, श्री नामदेव राऊत, श्री प्रदीप पाटील, सौ. माधवी दाणी, सौ. गीता पोलपोलवर, श्री धाबेकर, श्री. गिरीष शुक्ला, श्री मनोज सोनकुसरे, श्री नवले, श्री मयूर मलिक, श्री विजय भुजकुंडे, श्री कुंभारे, श्री झाडे तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.