चंद्रपूर/प्रातिनिधी:
समता फाउंडेशन, मुंबई व जिल्हा सामान्य रुग्नालय, चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे कारागृह अधीक्षक मा. वैभव आगे यांचे प्रमुख मार्गदर्शनामध्ये बंदी बांधवांसाठी नेत्ररोग तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारागृहाचे प्रभारी अधीक्षक रविंद्र जगताप उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.पेंदाम सर, नेत्र चिकीत्सकअधिकारी , डॉ अमित डांगेवार, कारागृह वैद्यकीय अधिकारी, डॉ. निशा चांदेकर नेत्र चिकीत्सकअधिकारी, डॉ. माधुरी कुळसंगे, नेत्र चिकीत्सकअधिकारी, तुरुंगाधिकारी सुनील वानखडे ,समता फाउंडॆशन मुंबई चे जिल्हा प्रतिनिधी श्री. विठ्ठल कदम, श्री.ललित मुंडे, तुरुंग शिक्षक, श्री. आय.एच. इनामदार, मिश्रक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात ही मान्यवरांची कारागृहाचे वतीने स्वागत करुन झाली.
तदनंतर प्रास्तिविकेतून कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमित डांगेवार यांनी कार्यक्राची रुपरेषा व उद्देश कथन केला. यावेळी समता फाउंडॆशन मुंबई चे जिल्हा प्रतिनिधी श्री. विठ्ठल कदम यांनी कारागृहातील बंद्याचे मनोरंजनाकरिता ०४ नग एल.ई.डी टी.व्ही. संच ,एम्प्लीफायर, स्पीकर माईक इत्यादी वस्तू कारागृहास भेट म्हणून दिल्या. तदनंतर कारागृहातील बंद्याची नेत्र तपासणी करण्यात आली व त्यांचे वर औषधोपचार करण्यात आला. सदर नेत्ररोग तपासणी शिबीराचा लाभ १३५ पुरुष व ०४ महिला बंदी यांनी घेतला ज्यापैकी ९५ बंद्याना समता फाउंडेशनच्या वतीने मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे प्रतिनिधी यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व नियोजन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री. देवाजी फलके, सुभेदार, श्री.सिताराम सुरकार, सुभेदार, श्री.विजय ढाले, शिपाई, श्री. अमोल कोडापे, शिपाई , श्री. विपीन राठोड, शिपाई यांचे सह इतर कारागृह कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त बजावत परीश्रम घेतले.