नागपूर/प्रतिनिधी:
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मद्य तस्करी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा खून करून जंगलात फेकण्यात आल्या घटना नागपूर बेला पोलीस ठाण्यांतर्गत बेल्लारपार शिवारांतर्गत सोमवारी दुपारी २.३० बाजताच्या सुमारास उघडकीस आली.संतोषसिंग तिलापितीया (२४) आणि संगतसिंग तिलापितीया (२२) दोन्ही रा. महालगाव, भिवापूर अशी मृतांची नावे आहेत.
त्यांच्या गावापासून काही अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. चंद्रपूर
जिल्ह्यात दारूबंदी असल्याने ते भिवापूर तालुक्यातून दारू खरेदी
करून ते चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचवायचे.
१६जुलैला रात्रीच्या सुमारास दोघेही भाऊदारू तस्करी करण्यासाठी घरातूननिघाले असता परतले नाही.दोघांनाही पोलिसांनी पकडले असावे,
असा त्यांच्या कुटुंबीयांना वाटले. पण, बरेच दिवसउ लटल्यानंतर ते परतले नाही अशी तिसऱ्या भावाला शंका आली. त्यांनी भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.तसेच परिसरात वन कर्मचाऱ्यांना जंगलात शोधण्याची विनंती केली.
सोमवारी वन कर्मचारी जंगलात फिरत असताना एका ठिकाणी शरण रचल्याप्रमाणे दिसले. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता तेथे दुर्गंध येत होता. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
त्यानंतर भिवापूरमध्ये तक्रार देणाऱ्याला बोलावण्यात आले.त्यावेळी मृतदेह कुजलेले होते. पण,मृतदेहावरील कपड्यांच्या आधारावर पटवण्यात आली.
ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.