सावली/प्रतिनिधी
तालुक्यातील व्याहाड खुर्द, चिचबोडी, बेलगाव, निमगाव, विरखल, पाथरी मार्गे सिंदेवाही तसेच अंतरगाव मार्गे मेहावरून पाथरी एसटी बस सुरू करण्यासाठी विभागीय आगार नियंत्रक वाडीभस्मे यांना निवेदन देण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या आधी बस नियमित सुरू करून देण्याचे दिले आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.
सावली तालुक्यातील काही भागातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना, शेतकरी, शेतमजूर, यांना बस अभावी मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो. विरखल गावात महामंडळची लालपरी येण्याची ही पहिलीच वेळ असेल. आगारात वाहक चालक कमी असल्याने सध्या बस सुरू होणारी नाही. नवीन भरती झालेली आहे. त्यामध्ये 220 वाहक चालक परीक्षा पास झालेले आहेत. ते रुजू होताच बस नियमित सुरू करण्यात येईल, असे आश्वासन विभागीय आगार नियंत्रक गडचिरोली यांनी आश्वासन दिले. तर येत्या काही दिवसात रोडचा सर्वे देखिल करण्यात येणार आहे. सर्वे झाल्यानंतर लगेच काही दिवसात बस सुरू करण्यात येईल, असे सांगितले. निवेदन सादर करताना कॉंग्रेसचे गडचिरोली लोकसभा माजी सचिव कुणालभाऊ पेंदोरकर, कॉंग्रेस तालुका महिला अध्यक्ष उषाताई भोयर, युवा नेते इश्वरभाऊ गंडाटे, नितिन दुवावार, युवा नेते आशिष पुण्यापवार, कमलेश खोब्रागडे, महेश निकुरे, राकेश नागपुरे, सुरज निकुरे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.