ललित लांजेवार/नागपूर:
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फन्ट जीजस आदिवासी वसतिगृहात झालेल्या अत्याचारप्रकारणी शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष धोटे आणि राजूराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना या प्रकरणात सीआयडी चौकशीत सहआरोपी केले आहे.
काल शुक्रवारी सीआयडीची टीम राजुऱ्यात चौकशी साठी आली असता अटकेच्या भीतीने सुभाष धोटे व नगराध्यक्ष अरुण धोटे हे फरार असल्याची माहिती आहे.या प्रकरणात राजूराचे डॉक्टर पिंपळकर यांनाही सीआयडीने आरोपी केले असून त्यांना अटक केल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी कोण कोण आरोपी आहेत याचा लवकरच उलगडा होणार आहे.
दोन दिवसापूर्वीच काॅंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी राजूरा मतदार संघात सुभाष धोटे हेच काॅंग्रेसचे उमेदवार असतील असे जाहीर केले होते.