भेजगाव ग्राम पंचायतीमध्ये सुरू आहे अनागोंदी कारभार सरपंचाच्या मर्जीतील लोकानांच मिळतो घरकुल योजनेच्या लाभ खरे लाभार्थी डावलल्या जात असल्याच्या गावकऱ्यांचा आरोप
मूल/रमेश माहुरपवार:
भेजगाव ग्राम पंचायतीमध्ये सरपंचाचा मर्जीतील लोकानांच घरकुल योजनेच्या लाभ दिल्या जात असल्याने ख—या आणि गरजु लाभार्थी योजनेच्या लाभापासुन वंचीत राहत असल्याच्या गावक—यांच्या आरोप आहे. या संबधाने संवर्ग विकास अधिका—यांकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने पंचायत समिती प्रशासनही सरपंचाच्या अधिनस्त काम करीत असल्याच्या आरोप होत आहे.
मूल शहरात रहीवास असलेल्या आणि केवळ राजकीय प्रतिष्ठेसाठी गावचे सरपंच पद मिळविणारे अखिल गांगरेडडीवार यांच्या भेजगाव ग्राम पंचायतीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असुन सरपंच आपल्या मर्जीतील लोकांना रमाई आणि इतर घरकुल योजनेच्या लाभ मिळवुन देत असुन विरोधक परंतु ख—या गतजु लाभाथ्र्याला डावलले जात आहे. सन 2018—19 या वर्षात भेजगाव ग्राम पंचायती अंतर्गत रमाई घरकुल योजनेत मंजुर करण्यात आलेल्या लाभाथ्र्यांच्या यादीतील अनेक नाव आक्षेपास पात्र असुन यातील अनेकांकडे पुर्वीचे चांगले घरं आहेत तर काही जण गावातच राहत नाही. मात्र ते सरपंचाचा मर्जीतील असल्याने संबंधीत अधिका—याने त्यांना रमाई घरकुल योजना मंजुर केली आहे. यासंबधाने गावचे उपसरपंच,सदस्य आणि काही गावक—यांनी 27 फेब्रुवारी 2019 ला मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना तक्रार दिली. परंतु त्यानंतरही आक्षेप घेण्यात आलेल्या लोकांचे नावं समाज कल्याण विभागाकडुन पंचायत समितीकडे प्राप्त झालेल्या यादी मध्ये आहेत. पंचायत समिती प्रशासनाने गावक—यांच्या तक्रारीला गांर्भीयाने घेतले नाही. पंचायत समितीचे प्रशासन सरपंचाच्या अधिनस्त चालत असल्याच्या गावक—यांनी आरोप केला आहे. सरपंच अखिल गांगरेडडीवार मूल शहरात राहुन भेजगाव ग्राम पंचायतीच्या कारभार हाकत असल्याने गावातील समस्या तोंड फाडुन आहे. ग्राम सेवक सरपंचाचा मनमानी कारभाराने त्रस्त झाल्याने सुटया काढुन त्यांनीही ग्राम पंचायतीकडे पाठ फिरविली.
ग्राम पंचायतीने ग्राम सभेत मंजुर केलेल्या यादीतील नांवाबाबत खात्री करण्याचे काम आल्यानंतर आम्ही संबधीत ग्राम पंचायतीमध्ये जावुन तेथील शिपाई सरपंचाला सोबत घेवुन यादीतील लाभाथ्र्यांच्या घरांची,जागेची पाहणी करून तसा अहवाल संबधीत विभागाकडे दिला जातो. विस्तार अधिकारी बावणकुळे