(प्रशांत गेडाम/ललित लांजेवार):
सिदेंवाही तालुक्यातील सर्वात मोठा गाव म्हणून ओळल्या जाणाऱ्या नवरगाव येथे शॉर्टसर्किटमुळे मिरच्याच्या सात्र्याला भीषण आग लागली.
अंतरगाव फाट्या जवळील नवरगाव येथे रामदास दुरकीवार यांच्या राइसमिलमध्ये मागील ८ महिन्यांपासून मिरच्यांचा सात्रा आहे, अमेरिका सतरा आंध्र प्रदेशातील एका व्यापार्याच्या असल्याचे सांगितल्या जात आहे शनिवारी दुपारी या मिरच्याच्या सात्र्याला शार्टशर्किटमुळे आग लागली.
बघता बघता या आगिने रौद्र रूप धारण केल्यामुळे लोकांना आपले काम तिथेच ठेऊन पळ काढला . सुदैवाने जीवितहानी टळली या आगीत जवळपास दोन ते तिन लाखांचा माल जळल्याचे बोलले जात आहे.
या मिरच्यांचा सात्र्यांने नवरगाव परिसरातील गरीब लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता. होत होता.मात्र लागलेल्या आगीमुळे हा रोजगार देखील हातून निघुन गेला आहे.
त्यामुळे नवरगाव व आजू बाजूच्या गावकऱ्यांची चिंता वाढली आहे.
५० किमी पर्यंत अग्निशमन यंत्रच नाही
सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून नवरगाव ची ओळख आहे या गावची लोकसंख्या पंधरा हजारांहून अधिक आहे, सिंदेवाही सारख्या तालुक्याच्या ठिकाणी अग्निशमन यंत्र उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
सिंदेवाही सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आग लागल्यास पन्नास किलोमीटर दूर वरून अग्निशमन यंत्र बोलविण्यात येते हे अग्निशमन यंत्र सिंदेवाही व आजूबाजूच्या गावात पोहचे पर्यंत एक तासाचा अवधी लागतो.तो पर्यंत लागलेली आग संपूर्ण राख रांगोळी करून जाते.
सिंदेवाही तालुका व तालुक्यातील एखादी गावात अशी आगीची भीषण घटना घडली असता त्यावर नियंत्रण आणणे कठीण आहे. सिंदेवाही पासून 40 किलोमीटर अंतर मूल चे आहे, पन्नास किलोमीटर अंतर ब्रह्मपुरी 40 किलोमीटर अंतर चिमुरचे आहे. या ठिकाणी अग्निशमन यंत्र वाहन उपलब्ध आहे. एखादी मोठी घटना घडल्यास या तिन्ही ठिकाणाहून अग्निशमन यंत्र येण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो त्यामुळे अशा आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यासाठी दोन अग्निशमन यंत्राची मागणी होऊ लागली आहे
मागील कित्येक दिवसांपासून तालुक्यात अग्निशमन यंत्र देण्याची मागणी नगरपरिषद व स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांच्यापर्यंत करण्यात येते मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही, त्यामुळे आता पुन्हा अशा आगीवर नियंत्रण आणायचे असणार तर आणणार तरी कसे.असा प्रश्न सिंदेवाही तालुका वासीयांना पडला आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध |