नागपूर/प्रतिनिधी:
शुक्रवारी बिबट्याच्या हल्यात मरण पावलेल्या ६५ वर्षीय महिला गयाबाई पैकू हटकर, यांच्या निवासस्थानी
आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी यांनी भेट दिली,२ दिवसापूर्वी याच गावात ९ महिन्याच्या मुलाला घरातून उचलून जंगलात नेऊन ठार केले. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हि गंभीर बाब लक्षात घेता मुंबईकडे निघालेले वडेट्टीवार यांनी मुंबई जाने सोडून परत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावाकडे आले.या घटनेनंतर या ठिकाणी वनमंत्री, वनअधिकारी आमदार व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय प्रेताला हात लावू देणार नाही असे ठणकावून गावकऱ्यांनी वनकर्मचाऱ्याना सांगितले.
वडेट्टीवार यांनी तेथील नागरिकांसोबत चर्चा करून गावातील नागरिकांच्या मागण्या ऐकून घेतल्या व तिथे हजर असलेले ACF भोंगळे मॅडम याना तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा CCF यांना या ठिकाणी बोलावून नागरिकांच्या मागण्या ज्या आहेत त्या लिखित स्वरूपात लिहून देण्यात यावे व सदर मागण्या येत्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करण्यात याव्या व सदर अधिकारी ४ तासात गडबोरी या गावात न पोहचल्यास सदर प्रेत उचलून चंद्रपूर येथील CCF कार्यालयात नेऊन मागण्या पूर्ण होत पर्यंत प्रेत उचलू देणार अशी धमकी मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी उपस्थित असलेल्या वनकर्मचाऱ्यना देऊन धक्काच दिला व सर्व उपस्थित वन अधिकाऱ्यांची ४ तासाच्या आत वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्याची तारांबळ उडाली
शुक्रवारी गयाबाई यांना पहाटे बिबट्याने घरातून उचलून नेऊन ठार केले, व २ दिवसापूर्वी याच गावात ९ महिन्याच्या मुलाला घरातून उचलून जंगलात नेऊन ठार केले. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.या घटनेची माहिती आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना मिळताच मुबई कडे जाण्याकरिता निघाले असता नागपूर विमानतळावरच सदर घटनेची माहिती मिळाली लगेच चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावाकडे रवाना झाले व व त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे CCF रामराव साहेब हे दिलेल्या वेळेनुसार ४ तासाच्या आत तिथे उपस्थित झाले व नागरिकांच्या ज्या समस्या होत्या,त्या आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या समक्ष लिखित स्वरूपात लिहून घेऊन १५ दिवसात पूर्ण करण्यात येईल,असे लिहून दिले त्यामुळे गावातील तणाव शांत झाला ते प्रेत वनविभागाच्या पंचनाम्या करीता स्वाधीन करण्यात आले..