चंद्रपूर/प्रतिनिधी:
आगामी चंद्रपूर महानगरपालिका पोट निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ८ अर्जांपैकी सर्व अर्ज वैध ठरले आहेत. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभाग क्रमांक ६ ( ब )करीता ३ तर बाबुपेठ प्रभाग क्रमांक १३ ( ब ) करीता ५ असे एकूण ८ अर्ज दाखल झाले होते. ७ जून रोजी सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर सर्वच अर्ज वैध ठरले आहेत. १० जून ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख असून ११ मे रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप तसेच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभाग क्रमांक ६ ( ब ) मधे - इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे कलामती रामकृपाल यादव, भारतीय जनता पार्टीतर्फे रंजना रवींद्र उमाठे, बहुजन समाज पार्टीतर्फे सुनीता सुभाष दोनोडे यांचे तर बाबुपेठ प्रभाग क्रमांक १३ ( ब ) मधे - भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदीप गणपत किरमे, बहुजन समाज पार्टीतर्फे भास्कर भाऊराव गहुकर, तर अपक्ष म्हणून राजू शंकरराव कृष्णापूरकर, संजय आनंदराव बुरडकर व प्रवीण शंकर खनके यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या दोन्ही जागांवरील पोटनिवडणुकीसाठी २३ जून एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.