'श्रमिक एल्गार' विधानसभा निवडणूक लढणार
नागपूर/प्रतिनिधी :
श्रमिक एल्गार' या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, आदिवासी आणि गोरगरीब महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या समाजसेविका पारोमिता गोस्वामी चंद्रपूर जिल्याच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवारांचे टेन्शन वाढले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यासाठी पारोमिता गोस्वामी यांनी जिल्यातील महीलांना सोबत घेऊन मोठा लढा उभारला होता. ब्रम्हपुरीचा निकाल बदलवू शकण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विद्यमान आमदार कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर पक्षांच्या ईच्छुक उमेदवारांसमोर त्या आव्हान उभे करु शकतात. याच भीतीमुळे वडेट्टीवार यांनी बुधवारी सावली येथे पक्ष कार्यकतर्यांची बैठक घेतली. यात त्यांच्या चेह-यावर पारोमिता गोस्वामी यांच्या उमेदवारीचे दडपण दिसून येत आहे. पारोमिता गोस्वामी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी त्यांनी विविध आंदोलने केली, महिलांचे मोर्चे काढले. शासन दरबारी लढा दिला. तत्कालिन कॉंग्रेस सरकारने समिती गठीत करून अहवाल तयार
केला. 2014 मध्ये भाजप-सेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात यशस्वी ठरलेला हा सर्वात मोठा लढा आहे. या लढ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण महिला त्यांच्याशी जुळल्या आहेत. ग्रामीण
भागातील नागरिकांचे प्रश्न शासन दरबारी थेट मांडून ते सोडविण्याच्या दृष्टीने विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानुसार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात त्यांनी भेटीगाठी आणि बैठका घेणे सुरु असल्याची माहीती आहे. सध्यातरी त्या कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणार, हे स्पष्ट झालेले नाही.
👇🏻 चिटकी गावात एल्गारचा जन्म
श्रमिक एल्गारची स्थापनाच मुळात ब्रम्हपूरी निर्वाचन क्षेत्रातील चिटकी गावातून झाली. त्यामुळे अनेक गावात पारोमिताला मुलगी समजून प्रेम करतात. सावली, सिंदेवाही, ब्रम्हपूरी या तीनही तालुक्यातील जवळपास सर्वच गावात या संघटनेचे लोक, कार्यकर्ते असल्यांने, त्यांचा लाभही मिळण्याची शक्यता आहे. हजारोंच्या संख्येत या संघटनेचे सभासद असले तरी, यातील प्रत्यक्ष मतदानात किती परावर्तीत होतात, हे पाहणे औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
✔नाराजी भोवणार
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विकास कामांवर 50 टक्के नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच सर्वेक्षणात समाजसेविका पारोमिता गोस्वामी यांना द्वितीय क्रमांकाची पसंती मते मिळाल्याने वडेट्टीवार यांचा विजय रथ रोखण्याची शक्यता आहे.