Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०७, २०१९

साप्ताहिक परेडसाठी जात असतांना पोलीस वाहनाचा अपघात

पो.निरीक्षकासह अन्य कर्मचारी जखमी 
वर्धा/प्रतिनिधी: 

  आर्वी येथून विरुळ मार्गे वर्ध्यात  साप्ताहिक परेडसाठी जात असताना जात असतांना झाडाच्या फांदीने पोलीस वाहनाचा अपघात झाला.या अपघातात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून एका जखमी पोलीस अधिकाऱ्यावर अमरावती रुग्णालयात उपचार सुरु आहे तर इतर पोलीस कर्मचार्यांवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.

गुरवारी वर्धेत अनेक ठिकाणी पाऊस पडला व अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला झाड्याच्या फांद्या पडल्या होत्या. अश्यातच झाडाची एक फांदी कोसळली व या फांदीमुळे गाडीला अपघात होऊ नये या हेतूने चालकाने गाडी थोडी वळवली. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटली.यात पोलीस निरीक्षक संपत चौहान, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढाले, रवींद्र खेडकर, सुनील मळणकर, सुरेंद्र कांदे, अमोल बडे हे पोलीस अधिकारी जखमी झाले.
  सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.