वित्तीय साक्षरता जनजागृती मेळाव्यात १५० शेतकरी
व १६बचत गटातील महिलांचा सहभाग
उमरेड/प्रतिनिधी:
उमरेड तालुक्यातील चांपा गावांमध्ये आर,बि,आय बँक नागपुर,चांपा शाखा आय डी बि आय बँक, व गट ग्रामपंचायत चांपा यांच्या सौजन्याने शेतकऱ्यांसाठी वित्तीय साक्षरता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.वित्तीय साक्षरता जनजागृती मेळाव्यात १५० पेक्षा जास्त शेतकरी , १६बचत गटातील महिला सहभागी झाले.
आर बि आई बँकचा उपक्रम" वित्तीय साक्षरता जनजागृती मेळावा "उमरेड तालुक्यातील चांपा गावातील ग्रामपंचायत कार्यालयच्या परिसरात आयोजन करण्यात आला.
आय , डी , बि , आय बँकेच्या सौजन्याने चांपा येथील शेतकऱ्यांसाठी वित्तीय साक्षरता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या मेळाव्याला उमरेड तालुक्यातील चांपा परिसरातील १५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा तसेच ग्रामीण युवक-युवती आणि १६महिला बचत गटांचा समावेश होता. आय डी बि आय बँक शाखा चांपा यांच्या सौजन्याने आर बि आई बँकच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन चांपा ग्रामपंचायत कार्यलयात केले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर , बि, आय बँक नागपुरचे महाप्रबंधक एस,अग्रवाल होते .
तर या कार्यक्रमात प्रामुख्याने आय , डी , बि , आय नागपुर जिल्हा शाखा बँकचे मुख्य महाप्रबंधक राजीव शर्मा , नागपुर शाखेचे महा प्रबंधक महेंद्र पटेल , वैशाली नेमलेकर यांनी बँकेमार्फत राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती, जन-धन योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना याबद्दलची सखोल माहिती दिली. या कार्यक्रमात आर बि आय बँकेची कार्यक्रमावली विस्तृत रुपात देण्यात आली.
चांपा क्षेत्रात आय डी बि आय बँकेच्या सहकार्याने ३० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या योजनेविषयीही माहिती यावेळी देण्यात आली. तसेच शेतकरी व युवक युवतींनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही केले. यावेळी शेतकऱ्यांचा व बँक खातेदाराचे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून चांपाचे सरपंच अतीश पवार होते .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आय, डी, बि, आय, बँकेचे नागपुरचे शाखा महाप्रबंधक राजीव शर्मा,महेंद्र पटेल,वैशाली नेमलेकर उपस्थितीत होते .
कार्यक्रमाचे संचालन रश्मी रामटेके यांनी केले .तर आभार चांपा शाखा अधिकारी अश्विनी डोंगरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अमित घाटे ,पंकज खोडे ,सतीश हजारे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.