आदिवासी मुलांचे वसतिगृह क्र.१ चंद्रपूर
चंद्रपूर:- थोर क्रांतीकारक व आदिवासी समाजसुधारक धरतीआबा बिरसा मुंडा यांचा पुण्यतिथीनिमित्त दिनांक ०९/०५/२०१९ ला आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र.१ बालाजी वार्ड चंद्रपूर येथे जननायक वीर बिरसा मुंडा यांचा पुण्यतिथी साजरा करण्यात आला आहे.या निमीत्याने *कंटू कोटनाके प्रतिनिधी* आ मु शास वसतिगृह क्र.१ चंद्रपूर. *सूरज निमसारकर* , *आकाश गेडाम* उपस्थिती होते.
बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. तरूण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.
अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकार्यांना धडा शिकवण्याचा विचार बिरसा मुंडा त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गाव गावात गुडे पडे मध्ये जाऊन समाजजागृतीचे काम केले आहे .
जल, जंगल आणि जमीनसाठी आवाज उठवणारे आदिवासी जननायक महान आंदोलनकारी वीर बिरसा मुंडा आणि इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात त्यांनी छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.
इंग्रजांनी त्यांना अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना जननायक हा किताब लोकांनी बहाल केला.
याप्रसंगी पंकज सिडाम, सुनील मडावी,केशव कोटनाके, नागेश मडावी,मारोती कोरवते,उत्तम आडे,सचिन आलम तथा वसतिगृहाचे विद्यार्थी उपस्थिती होते .