जबरी चोरी करण्याऱ्यावर गुन्हा दाखल
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुराबर्डी रोडवरील सुधांशू महाराज आश्रम समोरील मंगळवार ४ जून रोजी दुपारी १ च्या सूमारास फिर्यादी काजल दिलीप मेश्राम वय २३ व तिचा मित्र राहुल ठाकरे हे परीसरातून टू व्हीलर वर जात होते.
तेवढ्यातच ट्रिपल शीट ने एका अवेंजर गाडी क्र.३१-७६९४ वरील अनोळखी तीन इसमांनी त्यांना लाथ मारून पाडून चाकूच्या धाक दाखवून त्यांच्याकडून नगदी ५००० रु व चांदीची चाड तोड किमान अंदाजे ६०० रुपये असा एकूण ५६०० रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून घेऊन गेले असता पोलिसांनी आरोपीवर ३९२ , ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला.पोलीस सूत्राच्या माहितीनुसार
फिर्यादीने सांगितले प्रमाणे एका इसमाच्या उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूच्या बोटाच्या नखावर काळा डाग आहे.या स्त्रोतच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा शोध घेणे चालू केला असता नापोशि महेंद्र सडमाके यांना गुप्त बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील इसम हा वडधामना चौक परिसरात फिरत आहे.
त्यांचा शोध घेण्याकरिता पोउपनि अमोल लाकडे चमू सह त्याठिकाणी पहोचले.एक इसम संशयीत रित्या मिळून आल्याने पोलीसांना पाहताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला.त्याचे आरोपी नाव मोहित उर्फ शुभम शैलेश गजभिये वय १८ वर्ष राहणार दवलामेटी हेटी असून त्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर फिर्यादी ने त्याची ओळख घेतली असता त्यांनी गुन्हा कबूल केला.अटक केल्यानंतर त्याचा तीन दिवस पीसीआर घेण्यात आला. पीसीआर दरम्यान आरोपीकडून धारदार चाकू प्राप्त झाले व ते जप्त करण्यात आले. तसेच दोन अनोळखी इसमाचा शोध पोलीस घेत आहेत व पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात सूरू आहे. चौकशीत पोहवा अनिल गजभिये,नापोशि जितेंद्र दुबे,पोशि दिलीप आडे यांचे सहकार्य लाभले.