नागपूर/ललित लांजेवार:
जिल्हाधिक्याऱ्यांचे नाव सांगून अवैध दारु तस्करी करताना पोलीस शिपायासह एका बड्या अधिकाऱ्याच्या पुतण्याला वरोरा पोलिसांनी अटक आहे.
पोलीस शिपाई सचिन विनायक हांडे बक्कल नंबर 6659 व त्याचा मित्र प्रणव हेमंत म्हैसकर याला अटक करण्यात आली आहे .हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून छुप्या पद्धतीने नागपुर वरून चंद्रपूर व इतर ठिकाणी दारू आणत होते.
9 जूनला रविवारला सकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान नंदोरी टोल नाक्याजवळ नागपूर येथील वाहतूक पोलीस विभागात कार्यरत असलेला पोलीस शिपाई सचिन विनायक हांडे हा स्वतः गाडीने विदेशी दारू विक्रीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात आणत असल्याचे कळताच पोलिसांनी आपला सापळा रचला.यामध्ये पोलीस शिपाई सह त्याचा मित्र प्रणव हेमंत म्हैसकर ला पोलिसांनी नंदोरी नाक्याजवळ रंगेहात पकडले.
मागील काही वर्षांपासून चंद्रपुरात दारूबंदी असून अनेक लोक या अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात गुंतले आहेत.
यात राजकीय पक्षाचे कार्यकत्यांसोबत अनेक पांढरपेशी व पोलीस यांचा देखील सहभाग आहे.
या दारूच्या गाडीत आठ पेटी विदेशी दारू पकडण्यात आली. वरोरा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून , नऊ लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त हस्तगत करण्यात आला.सचिन हांडे आणि प्रणव म्हैसकर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करत अटक करण्यात आली आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध |