आपुर्ती निरीक्षकांनी शासकीय माल नसल्याचा दिला अहवाल
पारशिवणी/प्रतिनिधी:
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मेहंदी येथून पिकअप वाहनात गव्हाची ३१ पोती वाहून नेतांना कांद्री येथील प्रहार संघटनेच्या पदाधिकारी संगीता वांढरे यांनी अवैध रित्या रेशनचा माल वाहून नेत असल्याच्या संशयावरून वाहनाला थेट कन्हान पोलिसांच्या स्वाधीन केलं.वाहनातील शेतकरी यांच्या नुसार सदर माल हा शेतकऱ्याचा आहे.वांढरे यांच्या नुसार त्यात रेशन दुकानातील शासकीय गहू असल्याचा दावा केला जात आहे.अश्यात सदर माल कुणाचा हा पेच कायम आहे.
पारशिवणी तालुक्यातील मेहंदी गावात आशाबाई पांडुरंग वासनिक यांचे सरकारी रेशनचे दुकान आहे.मंगळवार सकाळी अशाबाईं यांच्या पुतण्या अरविंद हुकूम वासनिक हा पिकअप वाहनात गहू लादून कन्हान मार्गे कळमना मार्केट ला विक्री करण्यास नेत होता.वाहनात शेतकऱ्याच्या माला सोबतच सरकारी रेशन दुकानातील गव्हाची पोती असल्याची गुप्त माहिती प्रहार च्या संगीता वांढरे यांना मिळाली ज्याआधारे महामार्गावर कांद्री शिवारात गव्हाची पोती भरलेलं पिकअप वाहन थांबवून कन्हान पोलीस आणि पारशिवणी तहसीलदार सहारे यांना माहिती दिली पीएसआय हाके आणि राजेंद्र पाली यांनी वाहन ताब्यात घेऊन.तहसीलदार यांचे निर्देशाने आपुर्ती निरीक्षक सपना बारापात्रे यांनी कन्हान येथील राजस्व विभाग जे.जे.मेश्राम आणि पटवारी क्षीरसागर यांना घेऊन पोलीस गाठले.वाहनातील गहू खादाच्या बोऱ्यांमध्ये भरलेले होते.त्यातील गहू सॅम्पल म्हनून आपल्या कडे घेऊन फिर्यादी,वाहन चालक,शेतकरी सोबत रेशन दुकान मालक वासनिक यांच्या पुतण्याचा ब्यांन नोंदवून घेतला.
आपुर्ती निरीक्षक यांचे कडून आलेल्या अहवालानुसार वाहनात गहू असलेल्या पोत्यांमध्ये एफसीआई चा सील लागलेला नव्हताच गव्हाचा सँपल घेण्यात आलेला आहे.रेशन दुकान मालक वासनिक आणी त्यांचा पुतण्या अरविंद याच्या घरच्या आणि रेशन दुकानातील माला सोबत त्याला मॅच करण्यात आला आहे.सँपल रेशन दुकानातील मालासोबत मॅच झालेला नसून शेतकऱ्याच्या घरच्या मालासोबत मॅच झाल्याने प्रकरण आणि आरोप निरस्त्र असल्याचे स्पष्ट झाले.
तहसीलदार वरून कुमार सहारे
आपुर्ती निरीक्षकांन सोबत मी देखील गव्हाचा सँपल घेतलेला आहे.राजकीय दबावातून शासकीय धान्य अवैध रित्या विक्रीचे प्रकरण दाबण्यात येऊन निष्पक्ष कार्यवाही झाली नाही तर जिल्हा आपुर्ती विभागात तक्रार करून तहसील कार्यालया समक्ष उपोषणाचा शस्त्र हाती घेईल.
संगीता वांढरे प्रहार संघटन पदाधिकारी