चार दिवसात दुसरी घटना
नागपूर/ललित लांजेवार:स्वराज या नऊ महिण्याच्या बाळाला घरातून उचलून नेवून ठार मारल्याची घटना ताजी असतांनाच,पुन्हा एकदा अंगणात खाटेवर झोपलेल्या 65 वर्षीय महिलेला बिबट्याने ठार केले.गयाबाई पैकू हटकर असे या मृत्त महिलेचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात बिबट्याने हल्ला करत महिलेला जंगलात फरफटत नेले व ठार केले, या घटनेने संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण झालेली आहे,मागील चार दिवसा आगोदर एका नऊ महिन्याच्या बालकांना बिबट्याने खाटेवरून उचलून फरफटत नेऊन गळ्याचा घोट घेतला,व पायाचे लचके तोडले याही घटनेत बिबट्याने तसेच केले, व 65 वर्षीय महिलेला आपल्या शिकार बनवले .
रात्रो अचानक बिबट्या तीथे आला आणि खाटेवर झोपलेल्या महिलेवर हल्ला केला. पहाटे घरचे लोक उठले असता गयाबाई खाटेवर दिसली नाही, मात्र आजूबाजूला रक्ताचा सळा दिसला, यावरून शोध घेतला असता, बिबट्यानी तीला फरफरटत बाजूच्या नर्सरीत नेल्याचे दिसून आले.
वनविभागाचे स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ते शव उचलण्याची घाई करीत आहेत, मात्र गावकरी विरोध करीत असल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
याआधी झालेल्या घटनेत बिबट्याला वन विभागाकडून जेरबंद करण्यात आलेले आहे, मात्र वन्य प्राण्यांचा शिरगाव दिवसंदिवस गावात होत असल्यामुळे आता गावकऱ्यांना नवीनच डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.