चिमूर शहरात बिबट या वाघाचे धुमाकूळ:शेतकरी त्रस्त
रोहित रामटेके:
चिमूर नगर परिषद क्षेत्रातिल प्रभाग क्रमांक. १० मध्ये अनंता प्रभाकर कामडी यांच्या शेतात गट क्रमांक.३८२ मधिल गुराच्या गोठ्यात बिबट या वाघाने ३ गुरांना ठार केल्याची घटना आज दिनांक.०५/०६/२०१९ ला पहाटेच्या सुमारास गुरांच्या गोठ्यात घुसून बांधून असलेली ७ दिवसांची १ गोरी तर १ गोरी ६ महिन्यांची व ९ महिन्याची १ गोरी अशा ३ गुरांना ठार केले असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे कठिण झाले आहे.
हा प्रकार मागील ३ वर्षांपासून नियमित सुरु असून नेहमी पाळीव प्राण्यांवर बिबट व वाघ या प्राण्यांचे हल्ले होत असतात परंतु वनविभाग याकडे नेहमी दुर्लक्ष करीत असतात. तर एकिकडे जंगलामध्ये रिसोर्टची बांधणी करून पर्यटक मोठ्या प्रमाणात प्राणी बघण्यास ताडोबा अभयारण्यात येत असतात.व एकिकडे प्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधात शहरात व गावाकडे वडत असतांना दिसतात.यामुळे वाघाचे वास्तव्य जंगल आहे कि गाव काहिही कळेनासे झाले आहे.दररोज वाघाच्या हल्ले गावा - गावात होत असून वनमंत्री तथा वनविभाग व वनविभागाच्या पेट्रोलिंग विभागाने गांभिर्याने लक्ष देण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.अन्यथा आंम्ही शेतकरी या वाघ व बिबट या प्राण्यांना मारण्यास मागे पुढे पाहणार नाही असेही शेतकरी यावेळी म्हणाले.