Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून ०५, २०१९

धावत्या गाडीने घेतला अचानक पेट:चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील घटना

नागपूर/ललित लांजेवार:.
 रस्त्यावर एका धावत्या गाडीने अचानक पेट घटल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावर घडली.या घटनेत  महिंद्रा XUV गाडी आगीत जळून खाक झाली. नागपूरच्या सक्करदरा  येथून  २ मित्र या गाडीने चंद्रपुरकडे येत होते. वरोरा शहरालगत मांगली (देवतळे) गावाजवळ महामार्गावर गाडीने अचानक पेट घेतला.गाडीने पेट घेतल्याचे लक्षात आल्यावर दोघे बाहेर पडल्याने  बचावले आहे. या गाडीला आग लागल्याचे कारण मात्र समजू शकले नाही.

 या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.यात कोणतीची जीवित हानी झाली नाही,चंद्रपूरात उन्हाळ्यात आतापारीयंत ४ गाड्याना अचानक आग लागली आहे. 
पोल्ट्रीफीड उपलब्ध 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.