योगा समीती तर्फे गंगूबाईला कष्टकरी मातोश्री पुरस्कार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
स्वप्न बघितल्याने साकार होत नाही तर ते प्रत्येक्षात साकारण्यासाठी कष्ट हाच एकमेव पर्याय आहे. त्यामूळे आपल्या मूलांना व्यसनापासून दुर ठेवून त्यांना कष्ट करायला शिकवा त्यातूनच त्यांना त्यांचे उदयाचे भविष्य उज्वल करता येईल असे मत सत्कार कार्यक्रमात गंगुबाई जोरगेवार यांनी व्यक्त केले. कष्टकरी गंगुबाई यांचा आज रविवारी योगनृत्य ग्रुप जगन्नाथ बाबानगर, चंद्रपूर यांच्या तर्फे कष्टकरी मातोश्री पूरस्काराने गौरव करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या या प्रसंगी रनजीत डवरे, धर्मेद्र पाटील, पूनम पाटील, मंजु पानघाटे, सुरभी कठाने, यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना गंगुबाई म्हणाल्या की, आजची तरुनाई मोबाईल आणि इंटरनेटवर गुंग आहे. मात्र त्याचा अतीवापर युवकांना सूस्त बनवत आहे. झटपत मोठे बनायच्या शर्यतीत आजचा युवकांचा मार्ग भटकला आहे. त्या युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. नेटच्या दुनीयेत अडकलेला आमचा तरुन कष्ट करायला लाजू लागला आहे. त्यामूळे आज त्याच्या हाताला काम नाही.
या युवकाने कष्ट करायला न लाजता शक्य ते काम केले पाहिले. त्यातूनच त्याचे उदयाचे भविष्य साकारले जावू शकते, असे त्यांनी यावेळी सांगीतले तसेच स्वता मी आज संपन्न परिवारात राहत असली तरी वयाच्या 80 व्या वर्षी सुध्दा टोपल्या विकण्याचा माझा व्यवसाय नित्यनियमाने करत असल्याचे गंगुबाई जोरगेवार यांनी सांगीतले.
गंगुबाई जोरगेवार या सर्व परिचीत सामाजीक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री असून कष्ट करुन उत्तम संस्कारातून त्यांनी आपल्या जोरगेवार परिवाराला संपन्न बनवीले आहे. त्या आजही महापालीके समोर टोपल्या विकण्याचे काम नित्यनियमाने करत आहे. याची दखल अणेक संस्था, संघटणांनी घेतली असून त्यांना विविध पूरस्काराने सन्मानीक करण्यात आले आहे. त्या समन्मात आता पून्हा कष्टीकरी मातोश्री पूरस्काराची भर पडली आहे.