Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून १०, २०१९

वाडीतील जवाहरलाल महाविद्यालयाने सिमला येथे फडकाविला झेंडा

लोकनृत्याला तृतीय पुरस्कार
 सोलन ( हि . प्र .) मध्ये अखिल भारतीय अभिनय २०१९ लोकनृत्य व नाटक स्पर्धा 
नागपूर / अरुण कराळे:

हिमाचल प्रदेश मधील सोलन ( शिमला ) येथे रविवार ३ जुन ते ९ जुन पर्यत अखिल भारतीय  फिलफॉट फोरम अभिनय २०१९ लोकनृत्य , नाटक आदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले . त्यामध्ये वाडीतील  लोककला अकादमीच्या मार्गदर्शनाखाली  वाडीतील जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातील  वरीष्ठ महाविद्यालयीन  विद्यार्थीनींनी लोकनृत्य स्पधैत छत्तीसगडी ठेमसा हे लोकनृत्य  सादर करून तृतीय पुरस्कार प्राप्त केला
हा पुरस्कार रविवार  ९ जुन रोजी  हिमाचल प्रदेश सरकारचे सामाजीक न्याय व सांस्कृतीक मंत्री ,हिमाचल प्रदेशचे सांस्कृतीक विभागाचे सचिव पुर्णीमा चव्हाण , पंजाबचे प्रसिद्ध गायक विक्रम सिध्धू यांच्या हस्ते तसेच फिलफॉट फोरम अकादमीचे नामधारी गुलाबसिंग ,विजय पूरी, योगेंद्र शेठी, राजीव उप्पल यांच्या प्रमुख उपस्थितीत  शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला  . या स्पधैत  महाराष्ट्र , उडीसा, मणीपूर ,आसाम, राजस्थान , छत्तीसगड, बिहार , हरियाणा , पंजाब , मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यातील कलाकारांनी नाटक , नृत्य, लोकनृत्य , पोषाख तसेच नृत्य प्रकारामध्ये कथ्थक , कत्थकली, भारत नाटयम् , कुचीपुडी, उडीसी मोहीनीभट्टर,स्तरीया, मनीपूरी, फोक तथा सेमी क्लासीकल, आदी कलेचे प्रदर्शन केले . 
 भव्य शोभायात्रेत वाडीतील महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी पारंपारीक लेझीम नृत्य सादर करून हिमाचल प्रदेश मधील  सोलन वासीयांचे लक्ष आकर्षित केले . तसेच यामधुन  बेटी बचाव व बेटी पढाओ चा  संदेश देण्यात आला . या नृत्याचे दिग्दर्शन विनोद बावणे ,बासरी वादक प्रतिक कांबळे, ढोलकी वादक  राहुल देशमुख , संजय बावणे  यांनी साथसंगत केली .
नृत्य कलावंत विशाल हिवसे , चेतन सोमकुवर ,जतीन ठाकरे , नितीन इंगळे,प्रिया भेंडे , काजल मुन , दिव्या काचोरे , स्वेता हनवते, काजल वाढई , शालीनी वासनीक , अंकीता टिकले , अभिषेक ठवकर यांनी नृत्य कला सादर केली . महाविद्यालयीन चमुचे नेतृत्व हर्षवर्धन कापसे यांनी केले .यावेळी  लोककला अकादमीचे मुख्य व्यवस्थापक  योगेश प्रधान, सचिन अतकरी , प्रशांत मस्की, अजय तायवाडे , निलेश पौनीकर आदींनी सहकार्य केले . विजयी चमुचे संस्थेचे सचिव युवराज चालखोर , प्राचार्य डॉ . जीवन दोतुंलवार, प्रा . डॉ . संजय टेकाडे , डॉ . सुभाष शेंबेकर, डॉ . मनिष चव्हान , डॉ . नरेंद्र घारड,डॉ . सुभाष ताडे, डॉ . नितीन कोंगरे , डॉ . चेतना लढ्ढा  , डॉ . नभा कांबळे, डॉ . मनिषा भातकुलकर, डॉ . अर्चना देशमुख , डॉ . कल्पना मंडलेकर, डॉ . प्रेमलता कुऱ्हेकर, डॉ .लीना फाटे , मिलिंद पाटील, दिनेश मानकर  , सतिश नवघरे  यांनी अभिनंदन केले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.