जोरगेवारांच्या आवाहणानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या टॅकर पुर्ववत सुरु
चंद्रपूर/प्रतिनिधी:
राजकीय आकसापोटी चंद्रपूर महानगर पालिकेने सामाजीक संघटणांच्या टॅंकरला पाणी देणे बंद केले आहे. त्यामूळे यंग चांदा ब्रिगेडच्या टॅंकर रिकाम्या उभ्या होत्या. परिणामी शहरात पाण्यासाठी नागरिकांना चांगलीच अडचण निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेत यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांची तात्काळ बैठक बोलावून चंद्रपूरकर तहाणलेला राहता कामा नये स्वताच्या बोअरवेल मधून टॅकरमध्ये पाणी भरुन ते शहरात वाटप करा असा कार्यकर्त्यांना आदेश दिला. याची सुरुवात त्यांनी स्वाताच्या घरुन केली. त्यानंतर आता यंग चांदा ब्रिगेडच्या पाणी टॅकर नागरिकांच्या सेवेसाठी पून्हा सज्ज झाल्या आहे.
शहरात भिषण पाणी टंचाईचे सावट आहे. यावर महानगरपालिका गप्प आहे. त्यामूळे किशोर जोरगेवार यांच्या पूढाकारातून यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून टॅकरच्या माध्यमातुन शहरात पाणी पूरवठा केल्या जात होता. टॅकरच्या माध्यमातून दररोज शहरातील संपूर्ण प्रभागात ही सेवा दिल्या जात होती. त्यामूळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र महानगर पालिकेने तात्काळ बैठक घेवून सामाजीक संघटनांच्या टॅकरला पाणी न देण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला त्यामूळे यंग चांदा ब्रिगेडच्या टॅकर बंद पडल्या.
त्यात महानगरपालिकाही शहरात पाणी पूरवठा करण्यात अपयशी ठरल्याने शहरात पाण्यासाठी हाहाकार माजू लागला. पाण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातही अणेक नागरिकांनी हजेरी लावली. त्यामूळे नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची तात्काळ बैठक बोलावली. यावेळी महानगरपालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहण्यापेक्षा चंद्रपूरच्या नागरिकांची तहाण भागण्याठी यंग चांदा ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आपला सहभाग नोंदवीला पाहिजे असे आवाहण कार्यकर्त्यांना जोरगेवार यांनी केले. यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या खाजगी बोरवेलमधून यंग चांदा ब्रिगेडच्या टॅकर भरण्याचा निर्णय घेण्यात आला याची सुरुवात किशोर जोरगेवार यांनी आपल्या घरच्या बोअरवेलच्या पाण्याने टॅकर भरुन केली. त्यानंतर आता यंग चांदा ब्रिगेडच्या पाण्याच्या टॅकर पून्हा सूरु नागरिकांना पाणी पूरवठा करण्यासाठी सज्ज झाल्या आहे.
या मोहिमेत यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते सहभागी झाले असून कार्यकर्त्यांच्या खाजगी बोअरवेल मधून पाण्याच्या टॅकर भरून शहरात वाटप भरण्यात येणार आहे.