Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून ०५, २०१९

दारूतस्करी करतांना कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अटक

 चंद्रपूर/प्रतिनिधी:


चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना आता राजकीय पक्षाचे कार्येकर्तेच दारू तस्करी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या आधी भाजपच्या युवा कार्यकर्त्याला दारू तस्करी प्रकरणी पोलिसांनी अटक केली तर आता विरोधक कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांना देखील दारू तस्करीत पोलिसांनी अटक केली आहे. 

नागपूर चंद्रपूर मार्गावरील जाम चौरसत्यावर पोलिसांना एका कारमध्ये विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.या आधारे कारवाई करत कारची तपासणी केली असता विविध कंपनीची १ लाख २० हजाराची दारू जप्त करण्यात आली .यात चंद्रपूर येथील कांग्रेस कार्यकर्ता संदिप सिडाम चंद्रकांत पवार , ब्रिजेश तामगाडगे याला अटक करण्यात आली.वाहनासह पोलिसांनी एकूण ८ लाख ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.