Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून ०५, २०१९

नागपुरात १० जून नंतर होणार पाणीकपात

नागपूर/प्रतिनिधी:
पाणी कपात साठी इमेज परिणाम
 नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प आणि कन्हान नदी प्रकल्पांनी तळ गाठला आहे. सध्या शहराला धरणांमधील मृत साठा (डेड स्टॉक) मधून पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईचे विदारक वास्तव लक्षात घेता आता शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासंदर्भात विचार सुरू आहे..

गतवर्षी पाऊस कमी पडला. त्यामुळे महापालिकेचे पाण्याचे नियोजन कोलमडले. शहरात पाणीसमस्या अधिक तीव्र होत आहे. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह जलाशयाने तळ गाठला. अन्य प्रकल्पांचीही अवस्था अशीच आहे. पाणी मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर आता 'डेड स्टॉक'मधूनच पाणी घेण्याची वेळ आली आहे. धरणाच्या तळाशी काही पाणीसाठा शिल्लक असतो. हा साधारणत: १५ टक्के पाणीसाठा राखीव असतो. धरणाच्या तळाशी असलेला पाण्याचा साठा गुरुत्वाकर्षणशक्तीने पुढे जात नाही. पंप लावून हा पाणीसाठा उपसावा लागतो. सुरक्षित जलसाठा म्हणून हा जलसाठा ओळखला जातो.

शहरात ठिकठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसतो. याला आळा घालण्यासाठी महापालिकेने हेल्पलाइन तयार केली आहे. सेव्ह वॉटर मोहीम महापालिकेने सुरू केली असून ही हेल्पलाइन त्याचाच एक भाग आहे. कोठेही टँकरच्या पाण्याचा दुरुपयोग होत असल्यास अवैध नळजोडणी असल्यास नागरिकांना तक्रार करता येईल. 

धकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्याचे प्रकार आढळून येत आहेत. अशा तीन प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे. यात एक प्रकरण मनीषनगर तर दोन प्रकरणे सतरंजीपुरा येथील आहेत. सिमेंट रोड आणि अन्य सरकारी प्रकल्पात पिण्याचे पाणी वापरण्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करण्यात आलेले पाणी वापरण्यात यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पोल्ट्रीफीड उपलब्ध 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.