चंद्रपूर/प्रतिनिधी:
युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी येत्या ६ जून रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहे. ते सध्या भाजपत आहे. नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांच्या सत्काराचा कार्यक़्रम येत्या ६ जून रोजी राधाकृष्ण सभागृहात आयोजित केला आहे. तिथेच आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थित ते घरवापसी करणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत सलग दहा वर्षे ते नगरसेवक होते. त्यांच्याकडे पक्षाने सभागृहाचे नेतेपद दिले. त्यानंतर दोन वर्षे स्थायी समितीचे सभापतिपदसुद्धा त्यांनी भूषविले. माजी खासदार नरेश पुगलियांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र, दरम्यानच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याशी त्यांचे वितुष्ट आले.
त्यांना काँग्रेसने नगरसेवकपदाची उमेदवारीसुद्धा दिली नाही. त्यामुळे मनपा निवडणुकीत शेवटच्या क्षणी ते भाजपमध्ये दाखल झाले. या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर भाजपने त्यांना अडगळीत टाकले. कोणतेही महत्त्वाचे पद त्यांना दिले नाही. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून ते दूर होते.
यावेळी लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार धानोरकर यांना सर्व शक्तीनिशी छुपा पाqठबा दिला. यापाश्र्वभूमीवर ते काँग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा होती. त्या चर्चेला येत्या ६ जून रोजी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने पूृर्णविराम मिळणार आहे. काँग्रेसमध्ये त्यांना नेमकी कोणती जबाबदारी दिली जाईल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.