शिक्षण विभागाची अनाधिकृत शाळांवर कारवाई
चंद्रपूर (खबरबात)/प्रतिनिधी:संग्रहित छायाचित्र |
शासनाच्या परवानगीशिवाय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनाधिकृत शाळा सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत नऊ अनधिकृत शाळांची यादी प्रकाशित करण्यात आली असून त्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.लोखंडे यांनी केले आहे.
सदर अनाधिकृत शाळांच्या यादीमध्ये चिचाळा येथील डिलाइट कॉन्व्हेंट, ग्लोबल माउंट पब्लिक स्कूल कोरपना, गोल्डन किड्स अकॅडमी स्कूल कोरपना, केजीएन पब्लिक स्कूल बल्लारपूर, शरद विद्या मंदिर वांद्रा तालुका ब्रह्मपुरी, नाईस इंग्रजी कॉन्व्हेंट सरकार नगर चंद्रपूर, शांती निकेतन कॉन्व्हेंट चंद्रपूर, राज इंग्लिश मीडियम स्कूल गडचांदूर, पोंभूर्णा पब्लिक स्कूल पोंभूर्णा यांचा समावेश आहे.
या शाळांना शासनाची कोणतीही परवानगी नसून या अनधिकृत शाळांवर शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत शिक्षण संचालक यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सदर शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊन स्वतःच्या पाल्याचे नुकसान करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाव्दारे करण्यात आले आहे.
युनिक फॅशन ऍकॅडमी:ऍडमिशन देणे सुरू |