Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून २४, २०१९

बळाचा वापर करून पोलिसांनी आदिवासी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिरडले


अंबुजा च्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - पप्पू देशमुख


चंद्रपूर- जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्त्वात मागील एक वर्षापासून अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमिहीन झालेल्या आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला 5 मार्च 2019 रोजी एक मोठे यश प्राप्त झाले.जिल्हा प्रशासनाने अंबुजा व्यवस्थापनाने भूसंपादन कराराचा भंग केला असल्यामुळे व्यवस्थापना विरुद्ध कारवाई करावी अशा प्रकारचा प्रस्ताव सहसचिव महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठविला आहे.परंतु आज पर्यंत या प्रस्तावाच्या अनुषंगाने सहसचिव महसूल विभाग यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच 1 महिन्यापूर्वी सर्व आदिवासी प्रकल्पग्रस्तांनी फसवणूक झाल्याची लेखी तक्रार करून अंबुजा व्यवस्थापनाच्या विरोधात ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये केलेली होती.मात्र दोन्ही प्रकरणामध्ये अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही .या दिरंगाईमुळे संतापलेल्या अंबुजाचे प्रकल्पग्रस्त आदिवासी व इतर शेतकऱ्यांनी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात दिनांक 24 जून रोजी अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. महसूल विभागाच्या सहसचिव यांचेशी चर्चा करून ठोस कारवाईचे लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका देशमुखवइतर प्रकल्पग्रस्तानी घेतली. दुपारी बारा वाजेपासून अंबुजा गेटवर या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तीन वाजेपर्यंत आंदोलनाच्या मागण्याबाबत कोरपण्याचे नायब तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी श्री कुणाल खेमनार यांच्याशी चर्चा केली व जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या सचिवांना स्मरण पत्र पाठवून आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.परंतु सदर प्रकरणात तीन महिन्यापासून कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे सह सचिवांशी चर्चा करून तातडीने ठोस कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका देशमुख व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली.शांततेने सुरू असलेल्या या आदिवासी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनावर दुपारी साडेतीनच्या सुमारास कोरपना उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यामावार,गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण व कोरपण्याचे नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत पोलिसांनी बळाचा वापर केला.पप्पू देशमुख यांचे पाय पकडून पोलिसांनी त्यांना फरफटत नेले. पोलिसांनी शांततेने आंदोलन करणार्‍या महिला व पुरुषांना जबरदस्तीने फरफटत नेल्यामुळे त्यांना जखमा सुद्धा झाल्या. बळजबरीने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना उचलून गाडीमध्ये कोंबल्यामुळे अनेकांना इजा झाली. यानंतर सर्व आंदोलन कर्त्यांना गडचांदूर पोलीस स्टेशन येथे अटक करून ठेवण्यात आले. मात्र कोणत्याही परिस्थितीत महसूल विभागाच्या सचिवांकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. वेळ आल्यास पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करून बेमुदत उपोषण सुरू करू असा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्त व जन विकास सेनेचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला.प्रकल्पग्रस्तांसोबत जन विकास च्या अनेक पदाधिकाऱ्यांवर सुध्दा पोलीसांनी बळाचा वापर करून त्यांना अटक केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.