Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे १३, २०१९

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांची राजूरा प्रकरणाबाबत भेट



महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा

चंद्रपूर, दि. 13 मे: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राजूरा येथील निवासी वसतिगृह प्रकरणाबाबत भेट दिली. याप्रसंगी त्यांनी महिला व बालविकास कार्यालयाचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तसेच बालकल्याण समितीचे अध्यक्ष वर्षा जामदार, मनीषा नखाते तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांच्याशी आदिवासी आश्रम शाळा येथील पीडित बालिकाबाबत केलेल्या कारवाई व समुपदेशन बाबत चर्चा केली.

तसेच पीडित बालिकांना बालकल्याण समितीसमोर हजर केल्याचे व नंतर बालिकांना पालकांच्या ताब्यात दिल्या बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांना मौखिक सूचना देऊन जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत आदिवासी विभागाअंतर्गत आश्रमशाळातील बालकांच्या शैक्षणिक प्रवेशाबाबत बालक तसेच पालक यांना समुपदेशन करावे अशा सूचना दिल्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.