रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल
चंद्रपूर, दि. 4 एप्रिल: महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16 नुसार सहकारी संस्था चंद्रपूरचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निबंधक पी.एस. धोटे यांच्या पथकाने चंद्रपूरचे अवैध सावकार शुभम लोणकर याचे घरी धाड टाकून त्यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशन मध्ये (एफआयआर ) दाखल करण्यात आला.
अवैध सावकारीवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2014 साली महाराष्ट्र सावकारी अधिनियम पारित केला तरीही अनेक ठिकाणी सावकारीचा अवैध धंदा सुरूच आहे. यावर नियंत्रणासाठी सहकारी संस्था चंद्रपूर कार्यालयामार्फत दिनांक 30 जानेवारी 2019 रोजी शुभम लोणकर यांचे राहते घरी धाड टाकण्यात आली होती. यामध्ये पथकातील अधिकाऱ्यांना आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी रीतसर चौकशी सुरू केली असता त्यामध्ये शुभम लोणकर हे अवैध सावकारी करत असल्याचे सिद्ध झाले.
उपनिबंधक कार्यालयाने शुभम लोणकर यांचे विरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमन 2014 चे 29 कलमानुसार दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी एफआयआर दाखल केली. या गुन्ह्याच्या संबंधित असलेली सर्व कागदपत्रे रामनगर पोलीस स्टेशनमध्ये सादर केलेली आहे. त्याद्वारे पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपुर यांच्या मार्फत सुरू आहे.