चंद्रपूर/प्रतिनिधी:
डाँक्टरांच्या निष्काळजीपणामूळे प्रसुती नंतर बाळासह मातेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली असून या प्रकरणाची सखोल चैकशी करुन दोषी डाँक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. यंग चांदा ब्रिगेडचे एका शिष्टमंळडाने या प्रकरणी रुग्णालयात जाऊन परिस्थती डाँक्टरांशी चर्चा केली आहे. यावेळी उपचारा दरम्याणचा निष्काळजी पणा लक्षात झाला आहे. शारदा येलमुले रा. विठ्ठल मंदिर वार्ड असे या मृत मातेचे नाव आहे.
आकाश येलमुले यांनी आपल्या पत्नी शारदा येलमुले हीला ७ मे २०१९ ला प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून भरती केले होते. त्यानंतर शुक्रवार दि. १० मे ला त्यांना मुलगा झाला परिवारात सर्वत्र आनंद असताना बाळाची प्रकृती अचानक खालावली त्यामुळे डॉक्टरांना तपासन्या करिता बोलावले डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित केले जन्मल्यानंतर १५ मिनीटामध्ये बाळ दगावल्याने परिवारावर दुख्खाचे डोंगर कोसळले. तर प्रसूती झाल्यावर अति रक्तस्त्राव सुरु असल्याने मातेलाही दवाखान्या मध्येच भरती ठेवण्यात आले. या दरम्यान तिच्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामूळे रक्तस्त्राव वाढल्याने शारदा आकाश येलमुले यांचा १८ मे ला पहाटे मृत्यू झाला. मातेवर उपचार सुरु असतांना तिची परिस्थीती खालावत चालली होती. मात्र या बाबत डाँक्टरांनी नातलगांना माहिती दिली नाही. या उलट डाँक्टरांना विचारणा करण्यासाठी गेलेल्या नातलगांशीच रुग्णालय कर्मचा-यांनी अरेरावी केली. असा आरोप नातलगांनी केला आहे. या बाबत यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्याशी मृतकच्या नातलगांनी संपर्क साधला यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचले यावेळी चौकशी केली असता मातेच्या प्रसूती दरम्यान उपचारात हलगर्जी पणा करण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामूळे या प्रकरणाची सखोल चैकशी करुन संबधीत डाँक्टरांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.