Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे २८, २०१९

सरपंच व उपसरपंच सहित दोन सदस्यांना अपात्र ठरवण्याचे प्रयत्न

 उमरेड/प्रतिनिधी:

उमरेड तालुक्यातील चांपा येथे आदीवासी पारधी समाजातील उच्चशिक्षीत  युवक सरपंच सर्वसाधारण गटातून थेट जनतेतून निवडून आल्यानंतर उपसरपंच पदी अर्चना अजय सिरसाम यांची निवड झाली. 
ग्रामपंचायत चांपा निवडणुकीत  आदीवासी आरक्षणातुन सदस्यपदी  मिराबाई गुलाब मसराम , सूरज माहुरे निवडून आले .

 आदीवासी पारधी व गोंड समाजातील सरपंच व उपसरपंच सह दोन सदस्यांनी  पदभार स्वीकारत सरपंच अतीश पवार यांनी सहा महिन्याच्या कालावधीत गावात ग्रामपंचायत मार्फत  वयोवृद्ध नागरिकांसाठी तीन वेळा आरोग्य शिबिर घेण्यात आली , ७०पेक्षा जास्त वयोवृद्धाना मोफत मोतीबिंदू वर शस्त्रक्रिया करून निशुल्क चष्मे वाटप केले .

वयोवृद्ध नागरिकांना श्रावण बाळ योजनेअंतर्गत ६०पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला , महिलांसाठी पहिल्यांदाच हळदी कुंकू कार्यक्रम जिल्हापरिषद अध्यक्ष निशाताई सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली , महिलांसाठी सरपंच अतीश पवार यांच्या मार्गदर्शनात सकाळ तनिष्का गट तयार करून झुणका भाकर केंद्र , शेवई पापड केंद्र , ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत नालेसफाई, गावातील उज्ज्वला योजनेंतर्गत 35कनेक्शन वाटप केले.  

आदीवासी महिलांना आदीवासी विकास विभागामार्फत अर्थसाह्य निधी करीता पाच लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला .युवकांसाठी व्यायामशाळा (जिम)सुरू करण्यात आली .सार्वजनिक वाचनालय  क्रिडा साहित्य , आदीवासी मुलांना अर्थसाह्य निधी मंजूर करून (ढोल) बाँड सुरू केला .

जलयुक्त शिवार मध्ये सर्वप्रथम चांपा गावाची निवड करण्यात आली , उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा प्रश्न सोडविला , गावांमध्ये पहिल्यांदाच स्मशानभूमी करीता जिल्हापरिषद अंतर्गत निधी मंजूर करण्यात आले , वनविभागाने आडथळा टाकला असता तत्काळ प्रश्न सोडविण्यात आला ,दलित वस्ती , ठक्कर बाबा योजनेतून  रस्ते नाल्यासाठी 20लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

गावामध्ये पारधी पाड्यावर पहिल्यांदाच वीजेकरीता तीन खांब मंजूर करून पाड्यावर वीज आणली , सरपंचाच्या मार्गदर्शनात पारधी पाड्यावर युवकांना स्वयंरोजगार करीता ROवाटर फिल्टर प्लांट , डीजे करीता आदीवासी विकास विभागातून अर्थसाह्य निधी मंजूर करून दिला .

पाणी पुरवठ्यासाठी साडे तीन लाखांचे  32केव्हीचे ट्रान्सफॉर्मर सार्वजनिक विहीरीजवळ बसविण्यात आले 

गावातील विकासकामे  अल्पावधीतच एक कोटी पेक्षा जास्त रुपये चे विकासाचे काम  ग्रामपंचायत मध्ये केल्याने माझी सरपंच श्रीराम हिरामन तागडे यांनी केवळ शासकीय जागेवर पारधी पाड्यात राहतो म्हणून तांत्रिक बाबींचा आधार घेत विरोधी उमेदवार  श्रीराम तागडे यांच्याकडून सरपंचांला अपात्र ठरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत , मात्र सर्वांसाठी घरे या फेब्रुवारी २०१२च्या राज्य शासन आधार घेत यासंदर्भात नागपुर जिल्हाधिकारी व  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आले .

उमरेड तालुक्यात ३०सप्टेंबरला सरपंच पदाच्या निवडणूका झाल्या .यात आदीवासी पारधी समाजाचा उच्चशिक्षीत युवक सरपंच अतीश पवार खुल्या गटातून विजयी झाला .अतीश पवार हा बि .ए , एम .ए इतिहास , बि .एड आहे.त्यानी आई आश्रमशाळेत स्वयंपाकी कर्मचारी असून भाऊ उच्चशिक्षीत आहे.पारधी समाजावर गुन्हेगारी प्रवृत्त चोरीचा ठपका लागल्यामुळे त्यांना गावात राहु दिला जात नाही .परिणामी ते गावाबाहेर आदिवासी पाड्यात राहतात .ही जागा शासकीय झुडुपी जंगलची असल्यामुळे त्यावर उभारली जाणारी वस्तू अतिक्रमित गणली जाते .

अतीश पवार चांपा गावाला लागुन असलेल्या आदीवासी पाड्यात  राहतो .शिकुनही नोकरी नसल्याने तो या निवडणुकीला उभा राहिला .पाड्यावरील लोकांनी आणि गावातील आदीवासी समाजाने त्याला मतदान केले आणि हा बेरोजगार युवक निवडून आला.मात्र विरोधकांना पाड्यातील एक युवक मुलगा निवडून येतो हे मानवले नाही आणि त्यांनी आता तांत्रिक बाबींचा आधार घेत त्याचे सरपंच पद कसे रद्द करता येईल , याद्रुष्टीने नागपुर जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली आहेत .

पारधी पाड्यातील लोकांना मतदानाचा हक्क आहे, त्यांच्यासाठी रस्ते तयार करून दिले जातात , तर त्यांना मालकी अधिकार का नाही ? असा प्रश्न आदीवासी विकास परिषदेने उपस्थितीत केला आहे .त्याची सरपंच पदी थेट जनतेतून झालेली निवड अतीक्रमणाच्या कारणास्तव रद्द करू नये , आदीवासी पारधी पाड्यातील घरांना मालकी हक्क देण्यात यावे असे निवेदन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना देण्यात आले .

अतिक्रमित पाड्याचा आधार घेत विरोध करायचा होता , निवडणुकीला उभे राहतानाच हवा होता .गावकऱ्यांचा आग्रहाने निवडणुकीला उभा राहिला , जनतेतून निवडून आलो गावात विकासकामे केले मला राजकारण करायचं नाहीत तर समाजकारण करायच आहेत असे सरपंच अतीश पवार यांनी सांगितले .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.