चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या कारवा जंगल परिसरात कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या एका वनमजुरावर वाघाने हल्ला केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
वाल्मिक मनोहर मांदाडे असे जखमीचे नाव असून तो मोहुर्ली येथील रहिवासी आहे.सध्या मनोहर यांचावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक मांदाडे व त्याचे सहकारी जंगलात काम करीत असताना जंगलात असलेल्या आंब्याच्या झाडावर आंबे तोडायला गेले असता अचानक दबा धरून असलेल्या वाघाने वाल्मिक मांदाडे यांच्यावर हल्ला केला.
जखमीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाघाने आपला पंजा वाल्मीकीच्या पाठीत गाडला या हल्यात ते गंभीर जखमी झाले.