Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २९, २०१९

जोरगेवारांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडचा भव्य मोर्चा धडकला महानगरपालिकेवर धडकला

मोर्चात गदयांचा समावेश, पाणी संकटावर चंद्रपूरकरांनी मोर्चातून केला प्रकट रोष
चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर शहरात मुबलक पाणी पूरवठा करा या मागणी करीता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर महानगर पालिकेवर भव्य जनाक्रोष मोर्चा काढण्यात आला. जैन भवन जवळून लेझीम पथकसह निघालेला हा मोर्चा महानगर पालिकेविरोधात नारेबाजी करत महापालीकेवर धडकला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. तसेच मोर्चात पाणी दया या मागणीचे फलकांसह सहभागी झालेल्या गदयांनी मोर्चा कडे नागरिकांचे लक्ष वेधले.

चंद्रपूर शहर देशात नव्हे तर जगात उष्णतेच्या बाबतीत अव्वल आहे. अश्यातच चंद्रपूर महानगर पालिका कंत्राटदासोबत आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी चंद्रपूकरांवर मानव निर्मीत पाणी संकट लादत आहे. त्यामूळे लखलखत्या उन्हात चटके सोशत नागरिकांना पाण्यासाठी चागलीच पायपीठ करावी लागत आहे. त्यामूळे नागरिकांमध्ये प्रशासना विरोधात चांगलाच रोष आहे. 

या विरोधात यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून वेळो वेळी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उचलण्यात आला आहे. असे असले तरी शहरातील पाणी समस्या सुटलेली नाही. विषेश बाब म्हणजे इरई धरणात मुलबल पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असतांना शहरात भिषण पाणी टंचाई निर्माण करणे हा चंद्रपूरकरांवर अन्याय आहे. 

चंद्रपूरातील अणेक भागात 5 दिवसाआळ पाणी पूरवठा केल्या जात आहे. ही बाब लक्षात घेता यंग चांदा ब्रिगेटच्या वतीने टॅकरद्वारे पाणी पूरवठा केल्या जात आहे. असे असले तरी महानगर पालिका गाढ झोपेतच आहे. त्यामूळे नागरिकांचा रोष लक्षात घेता आज यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगर पालिकेवर भव्य जन आक्रोष मोर्चा काढण्यात आला. 

जैन भवण जवळून निघालेला हो मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने होत. जयंत टॉकीज चौकातून वळण घेत थेट महानगर पालिकेवर धडकला या मोर्चात गध्यांना सहभागी करण्यात आले होते. मोर्चा महानगर पालिकेवर पोहचताच मोर्चाचे रुपांत्तर सभेत झाले. महापालिकेचे अधिकारी मानसांचे ऐकत नाही. त्यामुळे त्यांच्या नातलगांना सोबत घेवून आलो आहो असे या प्रसंगी गध्यांचा उल्लेख करतांना जोरगेवारांनी अधिका-यांना सुनावले. 

मार्चात महिला रिकामी मडके व हातात घेऊन पाणी दया अश्या आशयाचे फलक घेवून मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने उपायुक्त याना मागण्यांचे निवदेण देण्यात आले. 

योवळी नगरसेवक विशाल निंबाळकर, वंदना हातगावकर, दुर्गा वैरागडे, संतोषी चव्हाण, रुपा परसराम, नंदा पंधरे, कविता शुक्ला, माधुरी निवलकर, कल्पना शिंदे, गीता रामटेके, अमोल शेंडे, सुनील पाटील, कलाकार मल्लारप, हर्षद कानमपल्लीवार, सुधीर माजरे, विनोद अनंतवार, सचिन किरमे, राशेद हुसैन, धनंजय यादव यांच्यासह यंग चांदा ब्रिगेड व चंद्रपूरकरांची मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.