Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २९, २०१९

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस भरघोस प्रतिसाद;वीज जोडणीच्या कामांना गती

विदर्भातील 46 शेतक-यांची दिवसा वीजपुरवठ्याची स्वप्नपुर्ती

नागपूर/प्रतिनिधी:

शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात आजवर 46 सौर कृषीपंप कार्यान्वित करण्यात आल्याने कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपुर्ती होणे सुरु झाले असून नियोजित शुल्काचा भरणा केलेल्या शेतक-यांकडेही सौर कृषीपंप कार्यान्वित करण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आले आहे.

प्रत्येक राज्याच्या विकासात कृषी क्षेत्राचे महत्वपुर्ण योगदान असते आणि त्यासाठी कृषीपंपांना शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणेही गरजेचे आहे, ही बाब हेरुन राज्यातील शेतक-यांना दिवसा दर्जेदार आणि विश्वसनिय वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आणि ऊर्जा तथा नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या पुढाकाराने सर्वत्र भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत सहभागी होण्याकरिता आजपर्यंत विदर्भातील अर्ज प्राप्त झालेल्या 38 हजार 624 शेतक-यांपैकी 23 हजार 169 अर्ज मंजूर करण्यात असून आवश्यक शुल्कापोटी मागणिपत्र दिलेल्या 6 हजार 520 शेतक-यांपैकी 3 हजार 911 शेतक-यांनी आवश्यक शुल्काचा भरणाही केलेला आहे. त्यापैकी 3 हजार 430 शेतक-यांची यादीही संबंधित कंत्राटदारांना देण्यात आली असून 1 हजार 570 ग्राहकांचा स्थळ पाहणी अहवाल आलेला आहे. याशिवाय आत्तापर्यंत 46 शेतक-यांकडे सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत, यात वाशिम जिल्हयातील 15, अमरावती जिल्ह्यातील 9, गोंदीया जिल्ह्यातील 3 तर नागपूर जिल्ह्यातील 19 सौर कृषीपंपांचा समावेश आहे. तर उर्वरीत पंप कार्यान्वित करण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहेत. 

या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 3 एचपीसाठी 16 हजार 560 (दहा टक्के) तर अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना 8 हजार 280 एवढी भरावी लागणार आहे. तर 5 एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 24 हजार 710 (दहा टक्के) तर अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना 12 हजार 355 एवढी रकमेचे मागणिपत्र देण्यात आले आहेत. याशिवाय पारंपरिक वीजपुरवठ्यासाठी रकमेचा भरणा करून प्रलंबित यादीत असलेल्या संबंधीत लाभार्थ्यांची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येणार असून त्यांना उर्वरित फरकाची रक्कम भरावयाची आहे. प्रथम पैसे भरणा-यास प्राधान्य या तत्वावर शेतक-यांना सौर कृषीपंप बसवून देण्यात येत असल्याने मागणिपत्र मिळालेल्या शेतक-यांनी आवश्यक शुल्काचा भरणा त्वरीत करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. 

योजनेची वैशिष्ट्ये
सौरकृषीपंपामुळे दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता राहणार असून दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. या पंपामुळे वीज बिलापासून मुक्ततेसोबतच डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च असणार आहे. पर्यावरण पुरक परिचलन असलेल्या या पंपामुळे शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे शक्य होणार असून यामुळे औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करणे सहज शक्य होणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा जिल्हावार तपशिल

जिल्हा        प्राप्त अर्ज           मंजूर अर्ज      मागणीपत्र वितरण शुलक भरणा
अकोला   2,722    1,665   745     422
बुलढाणा 4,838    2,003    342     215
वाशिम    7,500    5,197    2,652 1,007
अमरावती 2,649  1,900    611    366
यवतमाळ  4,907  2,483     87      60
चंद्रपूर       3,261 2,510    841     437
गडचिरोली 3,082  2,079   801    337
भंडारा       2,693   932     298    226
गोंदीया       2,519  1,279   289   160
नागपूर       2,605   2,027  721   523
वर्धा          1,849   1,094   220   158
एकूण नागपूर परिक्षेत्र:
 38,624    23,169    6,520    3,911


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.