Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २९, २०१९

चंद्रपूरचा पारा जगामध्ये सर्वाधिक;मंगळवारचे तापमान 47.8 डिग्री सेल्सिअस

चंद्रपूर/प्रतिनिधी:
संबंधित इमेज
अक्षरशः अंगाची लाही लाही होणे काय असते, याचा प्रत्यय आज चंद्रपूरकरांना आला. चंद्रपूरचे मंगळवारचे तापमान जगात सर्वाधिक म्हणजे 47.8 डिग्री सेल्सिअस एवढे वाढले होते. जगामध्ये आज चंद्रपूर सर्वाधिक तापलेले शहर होते. त्यापाठोपाठ पाकिस्तानमधील जाकोबाबाद व नागपूर महानगर तापले होते. या दोन्ही शहराचे तापमान 47.5 डिग्री सेल्सिअस होते. 

चंद्रपूर व परिसरात हल्ली पहाटे सात वाजता देखील लख्ख ऊन पडत असून अगदी सकाळपासूनच घामाच्या धारांना सुरवात होते. आज चंद्रपूर व परिसरात कर्फ्यू सदृश्य स्थिती होती. रस्त्यावर दुपारची वर्दळ अतिशय तुरळक होती. 

जिल्हा प्रशासनाने व महानगरपालिकेने यासंदर्भात नागरिकांना आधीच सतर्क केले असून फारच आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे सुचविले आहे. चंद्रपूर शहरांमध्ये महानगरपालिकेच्या मार्फत मोठ्या प्रमाणात थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था देखील वाटसरूंना थंड पाणी मिळेल यासाठी प्रयत्नरत असून प्रत्येक चंद्रपूरकर सुद्धा घरातून निघताना चेंज द बॉटल या मोहिमेमध्ये सहभागी झालेला आहे. 

सध्या शाळा कॉलेज बंद असल्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून शाळकरी मुलांचा बचाव होत आहे. तथापि, प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ऊन लागलेल्यासाठी विशेष कक्ष स्थापन केले आहे. नागरिकांनी त्याचा आवश्यकतेनुसार फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी या काळामध्ये स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 फॅशन डिझायनिंग करा:चंद्रपुरात प्रवेश देणे सुरु


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.