औरंगाबाद- महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन संदेश कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील गड किल्ले ऐतिहासिक स्मारकासोबतच नैसर्गिक वारसा असलेल्या वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्पांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी एक मे रोजी चंद्रपूर शहरातून सुरू झालेली परिक्रमा विदर्भातून मराठवाड्यात दाखल होत आहे. औरंगाबाद शहरात रविवार, दि. ५ मे २०१९ रोजी टीम दखल होईल.
एक मे रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर ही परिक्रमा चंद्रपूर येथून रवाना झाली. चंद्रपूर येथे गेले ७०० दिवस सलग काम करून ११ किमी किल्ली स्वच्छ केल्यानंतर ऐतिहासिक वारसा व वन्यजीव संवर्धन संदेश महाराष्ट्रभर पोहोचवण्याच्या हेतुने इको - प्रो संस्थेचे २५ स्वयंसेवक अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात दुर्ग परिक्रमा करीत आहेत.
चंद्रपूर ते गडचिरोली, गडचिरोली ते वैरागड आणि वैरागड ते कुरखेडा, सायंकाळी कुरखेडा ते नवेगाव बांध असा प्रवास पहिल्या दिवशी झाला. दुस-या दिवशी पवणी (जि. भंडारा) येथून नागपुर जिल्ह्यात आगमन झाले. ४ रोजी अमरावती, अकोला, खामगांव येथे कार्यक्रम झाले. ५ मे रोजी सकाळी 8 वाजता बुलढाणा, देउळघाट किल्ला येथे कार्यक्रम देउळघाट करून सिंदखेडराजा ते जालना असा प्रवास होईल. सांयकाळी 05ः30 जालना ते औरगांबाद मार्गाक्रमण करून औरगांबाद येथे सायं. ६.३० वाजता आईन्स्टाईन सभागृह, जे.एन.ई .सी. बिल्डिंग, एम.जी.एम. परिसर,येथे कार्यक्रम होईल. दुर्गप्रेमी, वन्यजीव संरक्षण व ऐतिहासिक वारसा या क्षेत्रात कार्यरत असणा-या सर्वांसाठी इको - प्रो संस्थेच्या सदस्यांबरोबर विशेष संवाद साधणार आहेत.