Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल ०५, २०१९

चंद्रपूरचा सुनील निशुल्क थंड पाणी वाटत करीत आहे मतदानाची जागृती

जलदूत पत्रकार झाला मतदान दूत

चंद्रपूरकरांंची तहान भागवणारा अवलिया

विशेष प्रतिनिधी/चंद्रपूर:
चंद्रपुरातील रणरनती दुपार, पारा ४३ डिग्रीवर पोहचलाय, सूर्य आग ओकतोय, घशाला कोरड पडली आहे .अश्यावेळी तुमच्यासमोर एक स्कुटर येऊन उभी राहते, त्यावर असते थंडगार पाण्याची पाणपोई, त्यातलं थंडपाणी गटागटा पिऊन तुमची तहान भागविणारे हे आहेत चंद्रपूरचे पत्रकार सुनील तिवारी.....

   चंद्रपूरचे तापमान वाढत असून 43 अंशाच्या पार गेलेले असल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवत असून त्यांच्या मदतीला आपल्या स्कुटर वरच मोबाईल पाणपोई उभारून तहानेलेल्या व्याकूळ वाटसरूंची तृष्णातृप्ती करण्यासोबतच नागरिकांमध्ये मतदानासंदर्भात जागृती करण्याचा अभिनव उपक्रम जलदुत सुनील तिवारी यांच्या मार्फत विनामूल्य राबवला जात आहे.२०१६ पासून मोबाईल पाणपोई द्वारे तहानलेल्यांना शुद्ध पाणी पोचवण्याचे व तसेच पाणी वाचवा असा संदेश देऊन जागृती करण्याचे तिवारी यांचे हे  कार्य सतत चार वर्षांपासून सुरू आहे.

सध्या ऊन तापत असल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास व्हायला लागतो. त्यावर उपाय म्हणून तिवारी यांनी ORS पावडर सुद्धा सोबत ठेवतात. तिवारी यांच्या अभिनव उपक्रमामुळे तहानलेल्यांना पाणी मिळतेच तसेच पाणी बचतीचा संदेशपण मिळतो. सोबतच मतदानाचा संदेश देण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने आजपासून तिवारी यांनी सुरू केलेला आहे.

उन्हाचा तडाखा जसा वाढत आहे तसाच आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी जिल्ह्यात सुरू आहे. 11 एप्रिल ला मतदान होत असून जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन स्वीपच्या माध्यमातून जागृती करत आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कामाला साथ देऊन सुनील तिवारी यांनी मतदानाविषयी मतदारांना जागृत करण्यासाठी आणखी एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या स्कूटीची विशिष्ट रचना तयार करून घेतली आहे. स्वतःच्या स्कूटीच्या मागील बाजूस पाण्याची कॅन बांधलेले आहे. त्यावर प्लास्टिकचे दोन ग्लासही असतात. 

त्यांच्या चारही बाजूला पाणी बचतीचे संदेशाचे फलक लावलेले असून त्यांच्या वरील बाजूस मतदार जागृतीचा फलक लावलेला आहे. त्यावर 'राष्ट्रीय कर्तव्य सहभागी, व्हा मतदानाला सिद्ध व्हा' असा संदेश त्यांच्या माध्यमातून मतदारांना देण्यात येत आहे. त्यांच्या अभिनय कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या तळमळीला साथ देऊन चंद्रपूरकरांनी पाण्याची बचत करून पर्यावरणाचे रक्षण करावे आणि मतदानाला मोठ्या संख्येत उपस्थित राहून लोकशाहीला बळकट करावे अशा भावना जिल्हा प्रशासनामार्फत व्यक्त केला जात आहे.

सुनील तिवारी गेल्या ३ वर्षापासून सातत्याने हा उपक्रम करत आले आहेत.तिवारी यांच्या या उपक्रमाची बातमी सर्वप्रथम काव्यशिल्प डिजिटल मिडीया (खबरबात) ने जनतेपुढे मांडली होती,तिवारी यांनी त्यांच्या कामात सातत्य ठेवल्याने त्यांच्या या कामाला आता जिल्हा प्रशासनाची देखील साथ मिळाली आहे. 

त्यांच्याकडे चारचाकी असूनही ते चंद्रपुरातील रणरणत्या उन्हात डोक्याला दुपट्टा बांधून दुचाकीने शहरातील कामे करायला आपली फिरती पाणपोई घेऊन निघतात. त्यांची गाडी जेथे जेथे थांबते तेथे तेथे नागरिक थंड पाण्याने आपली तहान निवांत भागवत आहेत. उन्हाळा सुरू होताच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक संघटनांकडून विविध ठिकाणी पाणपोईचे उद्घाटन करून वृत्तपत्रातून चमकोगिरी केली जाते. मात्र, कोणतीच पाणपोई निरंतर सेवा देऊ शकत नाही. या फिरत्या पाणपोईवर ‘पाणी वाचवा’ असा संदेश सुद्धा लिहिण्यात आला आहे.जागातील सर्वात जास्त तापमान असलेले शहर म्हणून चंद्रपूर शहराची ओळख आहे,अशातच शहरातील तप्णन बघता नागरिकांच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी मोठ्या संख्येने  पाणपोई उभारणे पालिकेची जबाबदारी आहे, मात्र अजूनही शहरात बऱ्याच बंद असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.

सुनील तिवारी चंद्रपूर साठी इमेज परिणाम
दिवसभरात ५०० नागरिकांना लाभ
 आज घोटभरासाठी माणसाची तडफड बघून लोकसेवेच्या भावनेतून हा उपक्रम राबवताना आनंद वाटतो. शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून पाणपोईची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकतांना अनेकदा बघितले, त्यामुळे विचार केला की, आपल्या हातून सुद्धा काही तरी सेवा या तहानलेल्यासाठी झाली पाहिजे. त्यामुळे स्वखर्चाने दुचाकीला एक लोखंडी ढाचा बसवून त्यात दोन ग्लास व एक थंड पाण्याची २० लीटर क्षमतेची कॅन बसवली आहे. कडाक्याच्या उन्हात मे महिन्या अखेर दररोज 25 कॅन्स मधून नागरिकांची तहान थंड पाण्याच्या मदतीने भागविली जाते.चंद्रपुरात तापमान वाढत असून पाण्याची सर्वांना गरज असते. म्हणून मी माझे कर्तव्य समजून तहानलेल्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे आणि पाणी बचतीचा संदेश देण्याचे काम करतोय. तसेच माझ्या जिल्ह्यातील मतदारांनी मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदानासाठी दिलेल्या सुट्टीचा देश बळकट करण्यासाठी उपयोग करावा, असे माझे मत आहे.
सुनील तिवारी, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.