Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल ०५, २०१९

सिंदेवाही शहरातील रेल्वेतून होते दारु तस्करी

सिंदेवाहीतील ६ चिल्लर विक्रेते पोलिसांचे जाळ्यात, मोठा मासा जाळ्याबाहेरच?

प्रशांत गेडाम/सिंदेवाही - 

सिंदेवाही तालुक्यात व शहरात पोलीस स्टेशन चे हद्दीत दारूविक्रीवर कांही प्रमाणात अंकुश बसला खरा, पण काही दारू विक्रेत्यांना चिल्लर आणि ठोक विक्रेते सक्रियच असल्याचे दिसून येत आहे. सिंदेवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार रामटेके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी  मोहीमे अंतर्गत चालू असलेल्या कारवाई सत्रात पीएसआय आवारे, पीएसआय पाटील ,मंगेश म्हात्रे ,

गणेश मेश्राम  राहुल रहाटे  यांनी दि. २/४/२०१९ ला दुपारी १-३० चे सुमारास रेल्वे स्टेशन कडून  तहसील रोडने सिंदेवाहीकडे पायदळ येत असता सिंगडझरी येथील आरोपी योगेश देवानंद मडावी, वय ४२ वर्ष व आरोपी नंदु पुंडलीक मेश्राम, वय ४० वर्ष यांचे संशयास्पद हालचाली वरून अंग झडती घेऊन चौकशी केली असता दोघांकडेही असलेल्या पिशवी मध्ये  दारूच्या बाटल्या आढळून आल्याने पोलीस ठाण्यात आणून दोघांनाही अटक केली. व २०,०००/-रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.

त्याच दिवशी रात्रौ ला  ११-३० चे सुमारास जैस्वाल काॅलणी ला लागून असलेल्या झोपडपट्टीतील १) अनुसया शामराव कावळे, वय ५१ वर्ष २) रिना संजय कावळे, वय ३८ वर्ष ३) आशा फकीरा कावळे, वय ४२ वर्ष ४) सुनिता सुकरू मेश्राम, वय ६० वर्ष यांचेकडून प्रत्येकी ५० देशी दारूच्या बाटल्या ९० मि. ली. च्या जप्त करून पोलीस स्टेशन ला जमा केल्या व रात्रीला सुचनापत्रावर सोडून,  

दिनांक ३/४/२०१९ ला सिंदेवाही येथील न्यायालयात एम. सि. आर. वर रवाना केले. सदर प्रोव्हिंशन मध्ये १९०/१९, १९१/१९, १९२/१९, १९३/१९, १९४/१९, १९५/१९ प्रमाणे ६५ (ई) म.दा.का नुसार गुन्हा दाखल आला.व त्यांचेकडून २०,०००/- रुपये असा एकून ४०,०००/- रुपये चा दारू साठा जप्त करन्यात आला. पुढील तपास ठाणेदार निशीकांत रामटेके साहेब हे करीत आहेत. दारूबंदी मोहीम (वाँश आउट) मोहिमेअंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर ठाणेदारांचे धाडसत्रामुळे व सिंदेवाहीतील काही प्रमाणात चिल्लर विक्रेत्यांवर आळा बसल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

सिंदेवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार रामटेके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी  मोहीमे अंतर्गत चालू असलेल्या  ही कारवाई पीएसआय आवारे, पीएसआय पाटील ,मंगेश म्हात्रे , गणेश मेश्राम  ,राहुल रहाटे यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.