Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०५, २०२०

9 मिनिटांसाठी लाईट बंद करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन वीजकंपन्यांसाठी बनले आव्हान

ललित लांजेवार/नागपुर:
कोरोनाच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी 9 वाजता 9 मिनिटे लाईट बंद करून दिवे लावा असं आवाहन केलं अन पंतप्रधानांच्या या आवाहनाने महावितरणची झोपच उडवली आहे.त्यामुळे खालपासून तर वरपर्यंतचे सर्व छोटे-मोठे अधिकारी कामाला लागले आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, रविवार 5 एप्रिल रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री नऊ वाजता संपूर्ण भारतात घरातील विजेचे दिवे बंद करून नऊ मिनिटांकरिता मेणबत्त्या, दिवे व मोबाईल टॉर्च लावण्यास जनतेला सांगितले आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल ग्रीडची सुव्यवस्था व ग्रीडचा बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होऊ शकतो अशी भीती महावितरणला आहे, पंतप्रधानांच्या या आवाहनाचा धसका महावितरण,महानिर्मीती,महापारेषणने घेतला आहे. 

जर देशात एकाचवेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होईल. लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटल्यामुळे जनरेशन आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बिघडून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास आणि कमी झाल्यास फ्रिक्वेन्सी फेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा काळजीपूर्वक विचार जनतेने करावा व लाईट बंद न करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावावी असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.

पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर महाराष्ट्रात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांना दिले आहे. 

पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल ग्रीडची सुव्यवस्था व ग्रीडचा बिघाड (Failure) टाळण्यासाठी तसेच नागरिकांना अखंडीत, सुरळीत व पूर्ववत विजेचा पुरवठा ठेवण्याकरिता ऊर्जा विभाग, प्रामुख्याने महानिर्मीती, महापारेषण, महावितरण व राज्य भार प्रेषण केंद्र यांनी काळजी घेणे  अत्यंत गरजेचे झाले आहे.  त्यामुळे या सर्व केंद्रांच्या वरीष्ठ अधिका-यांना तातडीने निर्देश देण्यात यावेत असे ऊर्जामंत्री नितिन   राऊत यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

केंद्रीय ऊर्जा मंञी (स्वतंञ प्रभार) आर. के. सिंग यांनी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहना संदर्भात सविस्तर चर्चा केली. या आवाहनामध्ये पथदिवे, घरगुती उपकरणे जसे टि.व्ही., संगणक, फ्रिज आणि एअर कंडिशनर हे बंद करण्यात येणार नाहीत. फक्त घरातले लाईट/दिवे बंद करण्यात यावे असे म्हटले आहे.

5 एप्रिल रोजी रात्री एखादी आकस्मिक परिस्थिती उदभवल्यास महाराष्ट्रातील 2585 मेगावॅट स्थापित वीज क्षमतेच्या जलविदयुत केंद्रातून आपल्याला तात्काळ महत्तम विजनिर्मीती करता येईल, जेणेकरून उदभवलेल्या परिस्थतीत पश्चिम ग्रीडचे संतुलन राखणे सुकर होईल असे डॉ. राऊत यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर वीज कंपन्या सक्रिय झाल्याअसून अश्या प्रकारे कोणतीच परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून ग्रिडच्या व्यवस्थापाच्या कामी लागल्या आहे, सर्व प्रयत्न करून देखील राज्यावर पॉवरडाउनची परिस्थिती आली तर सरकारची नाचक्की होणार, त्यामुळे पंतप्रधान यांचे हे आवाहन विज कंपन्यांसाठी परीक्षा ठरणार आहे, यावेळी वीज कर्मचारी त्याला कसे पेलतात हयाकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.