Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल ०५, २०१९

चंद्रपुरात राहुल गांधीं म्हणाले;मोदींनी फक्त श्रीमंतांचीच चौकीदारी केली

चंद्रपूर कॉंग्रेस सभा 




 सभेतील ठळक मुद्दे

मोदींनी ५ वर्षात देशातील १५ लोकांना लाखो कोटी रुपये दिले मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना माफी दिली नाही. 

पुलवामा हल्ल्याच्या दिवशी मोदींनी अदानीला ६ विमानतळ दिले. या मोदींनी फक्त श्रीमंतांचीच चौकीदार केली आहे, 

चौकीदार मजूर, शेतकरी यांच्या घराबाहेर असतात का? ते अदाणी, अंबानींच्या घराबाहेर असतात.

आधी अच्छे दिनचा नारा होता, या निवडणुकीच्या वेळी चौकीदार चोर है हा नारा आहे.

नरेंद्र मोदींनी १५ उद्योगपतींचं साडेतीन लाख कोटींचे कर्ज माफ केलं,आणि पंतप्रधान म्हणणात मी चौकीदार आहेत.

प्रत्येकाला १५ लाख रुपये देणं शक्य नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. जे शक्य आहे तेच आश्वासन काँग्रेसने दिलं. आमचं सरकार आलं तर आम्ही ७२ हजार देणार हे तुम्हाला आश्वासन देतो आहे.
२० टक्के गरीबांच्या खात्यात आम्ही पैसे जमा करणार, हे पैसे महिला आणि माता भगिनींच्या खात्यात जमा करणार आहोत.

सभेत चौकीदार चोर है या घोषणाही देण्यात आल्या. 

राफेलची किंमत आमच्या काळात ५२६ कोटी रूपये होती. आता ती वाढून १६०० कोटी रुपये झाली. या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे मोदी याबाबत खुलेपणाने बोलू शकत नाहीत. अनिल अंबानींनी कधी कागदाचे विमानही बनवले नाही तरीही राफेल करारात अनिल अंबानींचा ३० हजार कोटींचा फायदा करून दिला असेही राहुल गांधी यांनी भरसभेत मोदींवर आरोप केले.

२०१९ मध्ये आम्ही जिंकलो तर आम्ही GST पद्धतही बदलू, एक देश एक टॅक्स आणू असेही राहुल गांधींनी म्हटले आहे. 

जर आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर करू

मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे.  भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही.  

देशात पैशाची कमी नाही. जनतेला संभ्रमित केले जात आहे. 

या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेतृत्वाकडून अनेक ज्येष्ठ नेत्यांना वाढत्या वयाचे कारण देऊन उमेदवारी नाकारण्यात आली आहे.या सर्व बाबींचा संदर्भ देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.