रोहित रामटेके/गडचिरोली
जिल्ह्यात कुठलेही तांत्रिक साधने किंवा पुणे , मुंबईसारखी कला क्षेत्रातील सोयी सुविधा नसताना जिल्ह्यातील युवक कला क्षेत्रात नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहेत. गडचिरोलीच्या मातीतही कलाकार आपली कला उत्तमप्रकारे प्रेक्षकांसमोर आणू शकतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच सामान्य कुटुंबातील स्वप्नील बोरकर. त्याने नुकताच 'ह्रदय स्पर्शूनी' हा त्याचा व्हिडिओ अल्बम यु ट्यूब वर प्रदर्शित केला आहे. त्याच्या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
स्वप्नील बोरकर हा येथील गरीब कुटुंबातील असून याने स्वः लिखित, स्वतः गायन, स्वनिर्मित तसेच संगीतबद्ध करून, ' ह्रदय स्पर्शुनी' , हे अल्बम बनविले आहे. या गाण्याचे वालदे यांनी दिग्दर्शन केले. गडचिरोली येथील असलेल्या कलाकारांनी तसेच नागरिकांनी स्वप्नील बोरकर यांच्या अल्बमला , तसेच ' पहिल्या वहिल्या' मराठी गीताला पसंती दिली आहे. हे गीत यु ट्यूब च्या ' SB music gadchiroli' वर उपलब्ध आहे.