Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २७, २०१९

जन विकास सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने




आदिवासींवरील अन्याय व अत्याचाराचा निषेध
चंद्रपूर/ प्रतिनिधी 
जिल्ह्यात विविध ठिकाणी आदिवासींवर झालेल्या अत्याचार व अन्यायाच्या विरोधात जन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो आदिवासींनी आज दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव मध्ये 13 एप्रिल 2019 रोजी दुपारी तीन वाजता वन विभागाचे रेंजर श्री.राठोड व दफेदार श्री रोहनकर यांनी विजय किन्नाके या इसमास त्याचे राहते घरून जंगलामध्ये नेले. त्या ठिकाणी किन्नाके यांची शिकारीच्या संशयाखाली चौकशी करण्यात आली व व त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.अंधार पडल्यानंतर विजय किन्नाके यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली तसेच जवळच्या कुटीजवळ गावकऱ्यांसह जाऊन विचारपूस केली.यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी मुजोरी केल्यामुळे बाचाबाची झाली व गावकरी तक्रार देण्यासाठी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. मात्र तक्रार घेण्यास विलंब करण्यात आला त्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घेऊन गावकरी यांच्या विरोधात तक्रार दिली.या तक्रारीच्या आधारे गावातील शंकर वेलादी, मनोज वेलादी,सुरज वेलादी, चंद्रशेखर वेलादी, विक्रम सुरपाम व देविदास किन्नाके यांच्या विरोधात कलम 353 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे दिनांक 21 एप्रिल रोजी चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखुटा गावचे संतोष सुरपाम हे आपले रोजचे काम आटोपून हळदी गावावरून परत येत होतेा.वाटेत त्यांना व्याघ्र सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांनी अडवले व शिकारीच्या संशयावरून कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. याबाबत पिंपळखुटा चे सरपंच श्री विनोद मेश्राम व गावकऱ्यांनी व्याघ्र सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांना विचारणा केली असता गावकऱ्यां विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून कलम 353 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.आदिवासी विरुद्ध
प्रशासनाने कारवाई करण्यात तत्परता दाखविली.दुसरीकडे मात्र आदिवासींच्या कोवळ्या मुलींवर अत्याचार झाल्याची बाब दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी उघडकीस येऊनही एवढ्या गंभीर प्रकरणांमध्ये कारवाई करण्याची तत्परता प्रशासनाने दाखविली नाही. आदिवासींवर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात एकत्र येऊन शेकडो आदिवासींनी जन विकास सेनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व घोषणाबाजी करून निषेध केला व चोरगाव तसेच पिंपळखुट येथील घटनेची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची तसेच राजुरा येथील आश्रम शाळेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. कलंत्री यांना दिले.या आंदोलनात जन विकास सेनेचे घनश्याम येरगुडे, धर्मेंद्र शेंडे, अनिल कोयचाळे, किशोर महाजन,दिनेश कंपू, निलेश पाझारे ,राहुल दडमल, मनीषा बोबडे,निर्मला नगराळे ,राजू वाडगुरे ,जीवन कोटरंगे, आतिश आत्राम,लक्षपती येलेवार, अनिल रोडावर, रमेश मिलमिले, मारुती सुरपाम, शरद मोहुर्ले, संतोष मेश्राम,विजय शेडमाके,श्रीहरी सोयाम,प्रफुल बैरम,देवराव हटवार गोंडवाना गणतंत्र पार्टीचे धीरज शेडमाके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.