चंद्रपूर - पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीवर उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे तसेच महापालिकेच्या सर्व झोनमधील मोठे नाले व नदीतील गाळ काढण्याचे निर्देश आयुक्त संजय काकडे यांनी दिले आहेत. मनपा मुख्यालयात २२ एप्रिल सोमवारला आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीच्यानिमित्ताने बैठक घेण्यात आली. यात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीसाठी यंत्रणा सज्ज ठेवणे व संभाव्य अतिवृष्टीवर तातडीने कारवाई करण्यासाठी उपाययोजनाकरण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यंदा जून महिन्याच्या सुरवातीला पावसाळा अपेक्षित आहे. महानगरपालिका स्वच्छता विभागामार्फत दरवर्षी नाले व नद्यातील गाळ, कचरा काढला जातोे. परंतु हे काम पावसाळा सुरूहोण्यापूर्वी करण्याचे तसेच मोठे नाले व नद्यातील गाळ व कचरा काढण्यासाठी आवश्यकतेनुसार जेसीबीचा वापर करण्याची सूचना आयुक्तांनी केली. अग्निशमन विभागाने पाणीउपसण्याचे पंप सज्ज ठेवावेत, बंद असलेले पाणी उपसा करणारे पंप दुरुस्त करा आपात्कालीन यंत्रणा व झाडे तोडणारे पथक झोननिहाय तयार करण्याचे तसेच झोनमध्ये असलेले पाणीउपसण्याचे पंप, मशिन्स व पावसाळ्यात लागणारी उपकरणे दुरूस्त करून ठेवण्याचे सूचना याप्रसंगी करण्यात आल्या.
शहरातील ज्या भागात पावसाचे पाणी शिरते, ते भाग ओळखून तेथील रहिवासी व अतिक्रमणधारकांना नोटीस द्यावी, गरज पडल्यास त्यांना सुरक्षीत स्थळी पोहचविण्याची सूचनादेण्यात आल्या. गडरलाइन स्वच्छ करावी, गडर उघडे असतील तर त्यावर पावसाळ्यापूर्वी झाकणे लावावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले.
गेल्या वर्षी शहराच्या ज्या भागात पाणी साचले होते अशा भागातील नाल्यातील गाळ व कचरा काढण्याच्या कामाला सुरुवात करा. गेल्या वर्षी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होणारनाही, याची खबरदारी घेण्यासाठी सहायक आयुक्त व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला, उपायुक्त गजानन बोकडे, सहायक आयुक्त विजय देवळीकर, धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, वैद्यकीय अधिकारी ( आरोग्य ) डॉ. नितीन कापसे, शहर अभियंता महेशबारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, अनिल घुमडे, अग्निशमन अधिकारी व स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते