चिमूर /रोहित रामटेके:
चीमुर तालुक्यातील मांगलगाव येथील वरात मंडळी सकाळी १० वाजता ऑटो नी लग्न समारंभा करिता वाघेडा येथे जात असताना नेरी - जांभुळघाट रोडवर जवळ विरुद्ध दिशेने येत असलेल्या टिप्परला साइड देण्याच्या नादात ऑटो रस्त्याबाहेर गेल्याने पलटी झाल्याने यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत .
ऑटोत ९ प्रवासी आणि काही लहान मुलांचाही समावेश होता.ऑटो नेरी च्या जवळपास येत असताना टिप्पर खूप वेगात येत असल्याचे ऑटो ड्रायव्हर च्या लक्षात आले म्हणून ऑटो ड्रायव्हर ऑटो रस्त्याच्या कडेला घेण्याच्या नादात आटो पलटी झाला .
यात विजय रंदये मांगलगाव वय ५० हे गंभीर जखमी आहेत .तसेच विठोबा रंदये वय ५७,वनिता ढोणे वय ३५,सोहम ननावरे वय ६ ,मोतीराम श्रीरामे वय ७४ ,प्रिती दडमल वय २२,सुमन दडमल वय ४० हे सर्व रा. मांगलगाव येथील रहीवासी आहेत . ऑटो ड्रायव्हर प्रफुल गजानन शेंडे रा .जांभुळघाट हे सर्व जखमी झाले आहेत.ऑटोमध्ये ९ प्रवासी आणि काही लहान मुलांचा समावेश होता.
नेरी येथील प्रा. स्वा. केंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहे आणि काही जखमींना पुढील उपचाराकरिता चिमूर ला रेफर केले असल्याची माहिती नेरी प्रा. स्वा. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ईश्वर मेश्राम साहेब यांनी दिली.
चिमूर पोलीसांनी ऑटो चालकावर २७९ , ३३७ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.