चंद्रपूर/प्रतिनिधी:
विजबिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी शहरातीलं भिवापूर वॉर्डात घडली.याप्रकरणी आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. दीपक अंबादे असे अटकेतील आरोपीचे नाव असून, त्याच्याविरूद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या चंद्रपूर बाबुपेठ शाखा, कार्यालयात कार्यरत प्रेमानंद वसुलीसाठी गेले होते. अंबादे यांच्याकडे विजबिलाची ३ हजार ३०० रुपयांची थकबाकी होती. कर्मचाऱ्यांनी अंबादे याच्या घरी जाऊन थकीत रकमेबांबत विचारणा केली असता, त्याने यां दोन्ही कर्मचाऱ्यांशी अरेरावी करून मारहाण केली. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
होता. परंतु घटनेचे गांभीय लक्षात घेत बुधवारी आरोपीविरूद्ध भादंवि ३५३, ३३२, ३२३,५०४,५०६, कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी दीपक अंबादे याला अटक केली पुढील तपास पोलिस करीत आहे.